यंदाही खेळाडूंसाठी येत आहे स्व. हिंदूहृदयसम्राट चषक 2019 भव्य क्रिकेट स्पर्धा
बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- शिवसेनेचा ढाणा वाघ बदलापूर उपशहरप्रमुख व माजी नगरसेवक मंगेश धुळे यांनी याही वर्षी जय हनुमान क्रिडा मंडळ व शिवसेना शाखा जोवेलच्या वतीने स्व. हिंदूहृदयसम्राट चषक 2019 भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
बदलापूर पूर्व बदलापूर- कर्जत हायवे, खरवई नाका याठिकाणी दि. 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असे तब्बल 7 दिवस स्पर्धा चालणार असुन 32 बदलापूर, कल्याण डोंबिवली, मलंगगड इतर ग्रामिण संघ, रायगड भिवंडी व शहरी संघ खेळविले जाणार आहे. प्रथम पारितोषिक (ग्रामिण)ला 3 लाख 21 हजार 717 रुपये व चषक, िद्वतीय पारितोषिक (ग्रामिण)ला 1 लाख 61 हजार 717 रुपये व चषक, तृतीय पारितोषिक (ग्रामिण) व चौथे पारितोषिक (ग्रामिण) ला प्रत्येकी 51 हजार 717 रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच शहरी संघाला प्रथम पारितोषिक 1 लाख 1717 रुपये व चषक व िद्वतीय पारितोषिक 51 हजार 717 रुपये व चषक देऊन सम्मानित करण्यात येणार आहे.
त्याचसोबत ह्या स्पर्धेत ग्रामिण संघात उत्कृष्ट गोलंदाब व फलंदाज यांना प्रत्येकी एक एक टु व्हीलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास सोन्याची आंगठी व आकर्षक चषक व प्रत्येत सामन्यात सामनावीराना पारितोषिक देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मालिकावीर पटकाविणार्याला डॅटसन रेडीगो चारचाकी वाहन (ग्रामिण) तसेच एल.ई.डी. टीव्ही (शहरी) देऊन सम्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक व आयोजक मंगेश धुळे यांनी बदलापूर विकासच्या प्रतिनिधीजवळ दिली.
पारितोषिके व लाखोंच्या बक्षिसांमुळे संपुर्ण ठाणे जिल्ह्यात तसेच मुंबई, नवी मुंबई, पनवेल या शहरातही मंगेश धुळे यांच्या स्व. हिंदुहृदयसम्राट चषक भव्यक्रिकेट स्पर्धेची खेळाडु आतुरतेने वाट बघत असतात.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडु चेतन धुळे 9921963534, अजय धुळे 7030781757, विवेक गायकवाड 8600510231, गणेश ईरमाळी 7768048424 यांच्याशी संपर्क साधु शकतात. प्रवेश स्विकारण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2019 आहे.
दरवर्षी माननीय हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने तसेच ग्रामिण व शहरी भागातील क्रिकेट प्रेमीं खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक या नात्याने मी ह्या स्पर्धेचे श्रीगणेश केले होते. भव्य क्रिकेट स्पर्धा राबवितांना शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते व खासकरुन जोवेली येथील तरुणांच्या अथक परिश्रम व सहकार्यामुळेच मला हे शक्य झाले असुन दरवर्षी सातत्याने स्व. हिंदूहृदयसम्राट चषक भव्य दिव्य स्वरुपात क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाणार असे मी वचन देतो असे मंगेश धुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
No comments