Header Ads

  • ताजा खबरें

    मालमत्ता कर धारकांसाठी उमपा ने पुन्हा एकदा राबविले अभय योजना उपक्रम

    umpa-has-once-again-implemented-the-abhiyan-scheme-for-property-tax-holders उल्हासनगर (बदलापुर विकास मिडिया)- उल्हासनगर महापालिके क्षेत्रात मालमत्ता कर चुकविलेल्या मालमत्ताधारकांना पुन्हा एकदा मालमत्ता कर भरण्यासाठी म्हणुन करावरील विलंब शास्ती माफ करत असल्याचे समजते. अभय योजना 2018-19 या उपक्रमाद्वारे उमपा पुन्हा एकदा थकबाकीसह चालुक कराची संपुर्ण रक्कम दि. 15 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत एकरक्कमी भरणा करणार्या थकबाकीदार मालमत्ता धारकांना थकीत शास्तीवर 100 टक्के व्याज माफ करणार असल्याची माहिती उमपाचे आयुक्त यांनी दिली. तसेच 1 फेब्रुवारी 2019 ते 15 फेब्रुवारी पर्यंत भरणार्यांना 50 टक्के व्याज माफ करणार आहेत. तसेच मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्तेचे कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी महापालिकेसोबतच वार्ड ऑफिस, किऑक्स याठिकाणी सुद्धा कर भरता येईल असे सांगत उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील तमाम थकबाकी मालमत्ताधारकांनी ही संधी सोडु नये जेणेकरुन भविष्यात उमपाची जप्तीची कारवाई होणार नाही असेही शेवटी आयुक्तांनी सांगितले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad