Header Ads

  • ताजा खबरें

    मुरबाड एस.टी. स्थानक येथील सुलभ शौचालयातील ठेकेदाराचा मनमानी कारभार


    समाजसेवक अतुल देशमुख यांच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस 

    मुरबाडः- ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या सौजन्याने एसटी बस स्थानक परिसरात प्रवाश्यांसाठी महिलांसाठी मोफत सुलभ शौचालयाची व्यवस्था करण्यात आली असुन त्याठिकाणी महिलांकडुन तसेच लहान मुलांकडुन शौचास जाण्यासाठी 5 रुपये, 10 रुपये आकारले जात असल्याचे समजते. सदर विषय समाजसेवक अतुल देशमुख यांच्या लक्षात आल्याने महिलेकडुन पैसे घेतांना कर्मचार्‍याला रंगेहाथ पकडुन सदर प्रकार सोशल मिडियावर पोस्ट करण्यात आले आहे.

    सदर शौचालय सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्विस या कंपनीला व्यवस्थापनासाठी दिलेले असुन त्याठिकाणी काम करणारे कर्मचारी शौचालयात आलेल्या महिला व लहान मुलांकडुन पैसे उकळत असल्याची माहिती समाजसेवक अतुल देशमुख यांना मिळाली. त्यांनी सदर कर्मचार्‍यांना रंगेहाथ पकडण्यासाठी म्हणुन व्हिडीओ शुट करुन महिलेकडुन पैसे स्विकारतांना कर्मचार्‍याला पकडले असुन सुपरवायझरला जाब विचारणा करुन संपुर्ण घटना सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. तसेच महाराष्ट्र परिवहन विभागाने सदर ठेकेदाराविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील देशमुख यांनी केली असुन मागील अनेक दिवसांपासुन शौचालयात आलेल्यांकडुन शौचालयातील कर्मचारी पैसे उकळण्याचा प्रकार  करत होते अशी माहिती अनेक प्रवाशांनी बदलापूर विकास जवळ दिली.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad