Header Ads

  • ताजा खबरें

    ठाण्यात मामा वैद्य स्मरणार्थ वार्षिक राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा

    ठाणे – सालाबादप्रमाणे ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन व आर्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ०५ व ०६ जानेवारी २०१९ रोजी आर्य क्रीडा मंडळ, ठाणे येथे ही स्पर्धा होणार आहे. सदर स्पर्धा टीम ऑफ फोर तसेच पेअर्स पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत.
    नुकत्याच पार पडलेल्या एशियाड ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून कांस्य पदक पटकावणारे श्री. राजू तोलानी व श्री. अजय खरे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. ०५ जानेवारी रोजी सकाळी होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू व प्रतिनिधींच्या चहा, नाश्ता व भोजनाचीही व्यवस्था केली आहे. स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार दि. ०६ जानेवारी रोजी संध्याकाळी होणार आहे. बक्षीस समारंभानंतर एका स्नेह भोजनाचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी श्री. अनिरूद्ध संझगिरी – ९८१९२६७४५७ तसेच श्री. दक्षिणदास – ९००४०२२०८२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad