Header Ads

  • ताजा खबरें

    ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जनजागृती मोहिम

     नवी मुंबईदि.20 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहिम राबविण्याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेप्रमाणे कोकण विभागातील जिल्हयांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.

    या अनुषंगाने या जनजागृती मोहिमेदरम्यान वापरण्यात येणारी मतदान यंत्रे व अधिकारी/कर्मचारी यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत कोकण विभागातील सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जास्तीत जास्त माहिती प्राप्त करावी असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी विभागातील सर्व मतदारांना केले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad