Header Ads

  • ताजा खबरें

    दारूसाठी पैसे न दिल्याने केली मारहाण ; रामनगर येथील घटना

    बदलापूर:- मँट्रीक्स हॉस्पिटल मध्ये एक्सरे मशीन ऑपरेटर म्हणून काम करण्याऱ्या पंकज भूपांराय सोनी आपला काम करून घरी परतत असताना रामनगर दुर्गामाता मंदिर जवळ सुनील छद्द सिंग व राहूल या दोन व्यक्तींनी दारूसाठी पैश्याची मागणी करत पैसे न दिल्याच्या रागाने राहुल याने लाकडी बांबूने पंकजला डोक्यावर मारहाण केली तसेच सुनील सिंग याने पाठीमागून पीडितेला मारहाण करत डोक्यावर उलटा चॉपर मारून जखमी केले. त्यावेळी  पीडितेची आई व बहीण वाचविण्यासाठी आलेअसता त्यांना सुध्दा आरोपीने मारहाण केली. परिसरातील लोकांनी हे सर्व पाहून जमाव वाढत असल्याचे पाहून दोन्ही आरोपींनी तेथून पळ  काढला. जखमी अवस्थेत पंकज सोनी याने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रात नोंदविले असून आता त्याचा उपचार मॅट्रिक्स हॉस्पिटल येथे औषधोपचार घेत असल्याचे समजते.
    पीडितेच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी भा.द.वि. कलम ३२३, ३४ अंतर्गत दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad