`ग्रँड कॅन्टाटा - ए म्युझिकल ड्रामा’’कार्यक्रम संपन्न
ठाणे:- रोजच्या धावपळीच्या काळात तणावग्रस्त आयुष्यातून उत्तम, निरोगी आयुष्य कसे जगावे यासाठी ठाणे महानगरपालिका आणि इंटरनॅशनल युथ फेलोशीप, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित `ग्रँड कॅन्टाटा - ए म्युझिकल ड्रामा` हा विशेष सांगितीक कार्यक्रम आज डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला.
क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती दिपक वेतकर, यांच्या शुभहस्ते या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, इंटरनॅशनल युथ फेलोशीप साउथ कोरियाचे विभागीय संचालक किम जाम मीन, इंटरनॅशनल युथ फेलोशीपचे स्वप्नील कदम, ग्रँड कॅन्टाटाच्या संचालिका श्रीमती खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
`ग्रँड कॅन्टाटा - ए म्युझिकल ड्रामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन तणावग्रस्त जीवनातून आपण निरोगी आयुष्याकडे कशी वाटचाल करून शकतो तसेच रोजच्या दैनंदिन जीवनात कशा प्रकारे आपले वर्तन असायला हवे आदी गोष्टी मधुर संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. या सांगीतिक कार्यक्रमात जवळपास ५० हून अधिक कलाकारांनी आपली कला सादर केली.
No comments