निरंकारी युवा परिसंवाद आध्यात्मिकतेने समृद्ध समाजाच्या दिशेने युवाशक्तीला वळविण्याचा प्रयत्न
नवी मुंबई: निरंकारी युथ फोरमच्या वतीने खारघर स्थित सिडकोच्या विशाल मैदानावर येत्या २२ व २३ डिसेंबर, २०१८ रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन उपस्थितीमध्ये निरंकारी युवा परिसंवादाचे (निरंकारी युथ सिम्पोझियम) आयोजन करण्यात आले आहे.
हा २-दिवसीय कार्यक्रम आध्यात्मिकतेने समृद्ध समाजनिर्मितीच्या दिशेने युवाशक्तीला वळविण्यासाठी टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. युवाशक्तीचा उत्साह आणि ज्येष्ठांचा अनुभव यांचा अनोखा संगम करत प्रेम, नम्रता, सहनशीलता, विशालता यांसारख्या मानवीय मूल्यांचे संवर्धन करुन एका निखळ मानवसमाजाची जडण-घडण करण्याचा हा प्रयास आहे. या कार्यक्रमामध्ये संत निरंकारी मंडळाच्या मुंबई परिक्षेत्रातील १५ ते ४० वयोगटातील सुमारे १६००० तरुण महिला व पुरुष भाग घेणार आहेत.
या परिसंवादाचा मुख्य विषय “सहा तत्वं” म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आणि सहावे तत्व चैतन्य (Consciousness) आहे) ज्याची ओळख झाल्याने आध्यात्माचा पाया घातला जातो.
या कार्यक्रमाचा पहला दिवस खेळांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मिशनची अशी मान्यता आहे की, खेळांनी केवळ आपली शारीरिक क्षमता वाढते असे नसून आमच्यातील नकारात्मक व दूषित भाव दूर होऊन त्याठिकाणी सकारात्मकता आणि शुद्धता येते. अशाप्रकारे खेळांच्या माध्यमातून आपला शारीरिक आणि मानसिक विकास घडून येतो आणि एकमेकांच्या प्रति सौहार्दाची भावना वाढीस लागते. खेळांमध्ये क्रिकेट, फूटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन आणि ॲथलेटिक्स यांच्याशिवाय कित्येक अंतर्गत खेळांचाही समावेश करण्यात आला आहे.
परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी त्याचा मुख्य विषय असलेल्या सहा तत्वांवर विचारमंथन केले जाणार आहे. यामध्ये व्याख्याने, लघुनाटिका, मॉडेल्स तसेच भावपूर्ण भक्तीरचना प्रस्तुत करुन या विषयाव सखोल चर्चा केली जाणार आहे. युवावर्गामध्ये श्रेष्ठ मानवी मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याची भावना रुजवून समाजाच्या आध्यात्मिक उत्थानासाठी त्यांना प्रेरणा दिली जाणार आहे ज्यायोगे हे जग स्वर्गमय बनू शकेल आणि शांतीसुखाने राहण्यायोग्य स्थान बनू शकेल.
निरंकारी युथ फोरमचे पुनरुज्जीवन
निरंकारी युथ फोरमची निर्मिती सन १९७५ मध्ये निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख बाबा गुरबचनसिंहजी यांनी केली होती. त्यांनी पाहिले की, जगभरात युवावर्गाला चुकीच्या मार्गावर अग्रेषित केले जात आहे आणि त्यांच्या ऊर्जेचा दुरुपयोग केला जात आहे. विशेषत: या दुष्ट कार्यामध्ये धर्माचेही नाव जोडले जात आहे. युवाशक्ती ही एखाद्या दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीसारखी आहे. नदीवर बंधारे बांधून त्याद्वारे वीज निर्मितीसह सिंचनाचे कार्य केले जाऊ शकते; परंतु तसे केले नाही तर त्या नदीच्या प्रचंड प्रवाहाने, पुराने जीवित व वित्त हानीदेखिल होऊ शकते. युवाशक्तीचेही असेच आहे. जर तिला नियंत्रित करुन सकारात्मक कार्यामध्ये उपयोगात आणली तर प्रचंड विकास साधता येतो अन्यथा ही शक्ती जर नकारात्मकतेकडे वळली तर धरतीचे नर्कात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही.
हा विचार करुन त्यांनी निरंकारी यूथ फोरमची स्थापना केली आणि त्याद्वारे अनुशासनबद्ध कार्य करण्याची जबाबदारी बाबा हरदेवसिंहजी यांच्यावर सोपवली. बाबा हरदेवसिंहजी यांनी काही वर्षे हे कार्य मोठ्या जोमाने केले. परंतु सन १९८० मध्ये उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीत त्यांना मिशनच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागल्याने तेवढ्याच जोमाने हे काम पुढे चालू राहिले नाही. तथापि, मिशनच्या विविध उपक्रमांमध्ये युवावर्गाला त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले.
आता सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी निरंकारी यूथ फोरमचं पुनरुज्जीवन करुन त्याच्या अंतर्गत पुन्हा जोमाने कार्य करण्याची प्रेरणा निरंकारी युवावर्गाला दिलेली आहे. यामध्ये मिशनच्या विविध उपक्रमांशिवाय खेळांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.

No comments