Header Ads

  • ताजा खबरें

    संस्कृती आर्टस् फेस्टिव्हलच्या तरंगत्या रंगमंचासाठी 10 कोटीची उधळपट्टी, मनसेने केला महापौरांचा निषेध

    ठाणे - मुंबई विद्यापिठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिका आयुक्तांनी 20 कोटी देण्याची घोषणा केलेली असताना ठाणे महापौरांनी त्यास विरोध केला आहेमात्र आतात्यांच्याच स्वपक्षाच्या आमदाराने संस्कृती आर्टस् फेस्टिव्हलसाठी उपवन तलावात तयार करण्यात येणाऱया तरंगत्या रंगमंचासाठी 10 कोटीची मागणी ठाणे महापालिकेकडे केलीआहेयाबाबत महापौरांनी मौन बाळगले असून ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आयुक्तांनी दिलेल्या निधीला विरोध करणाऱया महापौरांचा मनसेने निषेध केला आहे
    ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याचा त्रास वाचावा  ठाणेकर विद्यार्थ्यांना विद्यापिठ उपकेंद्रात नवनवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास करता यावाचांगल्या सुविधा उपकेंद्रातमिळाव्यात या उदात्त हेतूने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उपकेंद्रासाठी 20 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होतीया निधीला ठाणे महापौरांनी विरोध केलाहोताआता संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट ने आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपवन तलावात तरंगता रंगमंच बांधण्यासाठी 10 कोटींची लेखी मागणी ठाणे महापालिकेकडे केलीआहेजर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमावर 10 कोटीची उधळपट्टी केलेली महापौरांना चालते मात्र विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न असलेल्या विद्यापिठाला निधी देण्यास महापौरांचाआक्षेप आहेया अगोदरही ठाण्यात बॉलीवूड पार्क, थीम पार्क, सुगंधी झाडे इत्यादी कल्पक तसेच आकर्षक प्रकल्पांच्या नावाखाली भ्रष्टाचार झालेला आहेच त्याची पुनरावृत्ती तरहोणार नाही ना याची काळजी घेण्यासाठी काय उपाययोजना केली आहेअसा सवाल मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे
    उपवन तलावातील माशांच्या अस्तित्वाला या रंगमंचामुळे काही धोका नाही याची खात्री केली आहे काआयुक्त  महापौर यांच्यातील संघर्षामुळे ठाणेकरांची करमणूक होतेचआहेतरी मुंबई विद्यापिठ उपकेंद्रासाठी दिलेला निधी ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे.  आधी शैक्षणिक गरजा पुर्ण करा त्यानंतर करमणुकीसाठी नवनवीन प्रयोग करा,असा सल्लाही मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad