Header Ads

  • ताजा खबरें

    लेखा व कोषागारे विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आजपासून बेलापूरमध्ये

    नवी मुंबई, दि. 21  : संचालनालय, लेखा व कोषागारे आणि संचालनालय स्थानिक निधी लेखा परीक्षा कर्मचारी कल्याण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2018 चे आयोजन दि.22 व 23 डिसेंबर 2018 या कालावधीत स्व.राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर-4, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई येथे  करण्यात आले आहे.

    या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार दि.22 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 8.30 वा. वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागारे) श्री. नितीन गद्रे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष (DATSWA) महाराष्ट्र राज्य तथा संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई श्री.ज.र.मेनन, उपाध्यक्ष (DATSWA) महाराष्ट्र राज्य तथा संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, मुंबई प्रताप मोहिते, माजी कसोटी क्रिकेटपटू जयंतीलाल केनिया, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कोच इम्तियाज खान, रणजी व आयपीएल खेळाडू श्रीदीप मांगेला यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 22 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 7.30 वा. विष्णूदास भावे नाट्यगृह, सेक्टर-16ए, वाशी नवी मुंबई येथे सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

    या स्पर्धेचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ रविवार 23 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 4.30 वा.नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते (कबड्डी) श्री.सुर्यकांत ठाकूर यांची उपस्थिती असणार आहे. संपूर्ण राज्यभरातून या क्रीडा स्पर्धेसाठी सुमारे दोन हजार अधिकारी/कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. असे सिताराम काळे, सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग तथा विभागीय अध्यक्ष DATSWA कोकण विभाग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad