Header Ads

  • ताजा खबरें

    बाल्मिकी विकास संघाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन 22 आणि 23 डिसेंबर रोजी ठाण्यात

    ठाणेदि. 19 - बाल्मिकी विकास संघाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन 22 आणि 23 डिसेंबर रोजी ठाण्यात ठाणे महापालिका इमारत मैदानशितलादेवी माता मंदिर जवळ , खारटन रोड येथे संपन्न होणार आहेया राष्ट्रीय अधिवेशनासाठी देशातील प्रत्येक राज्यांतून विचारवंत, क्रियाशील कार्यकर्तेसहभागी होणार असून बाल्मिकी समाजाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठराव या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.  
    22 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता समाजरत्न नानजीभाई ठक्कर आणि बाल्मिकी समाजाचे ज्येष्ठ नेते झब्बन हडाला यांच्या प्रमुख उपस्थितीतअधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.  या अधिवेशनात बाल्मिकी समाजाच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहेयात प्रामुख्यानेमहाराष्ट्रात जन्मलेल्या बाल्मिकी समाजातील बांधवांना महाराष्ट्रातील सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी जात प्रमाणपत्र मिळणेसाठी राज्यशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करणेसंपूर्ण भारतात बाल्मिकी समाजाला एस.सी., एस.टीमध्ये 50 टक्के आरक्षण दिले जावेमहाराष्ट्रातील शहरीभागात बाल्मिकी समाजातील सामाजिक संस्थांना बाल्मिकी भवन उभारण्यासाठी भूखंड द्यावाबाल्मिकीरुखीमेहतर समाजातील बांधवांना म्हाडाआणि सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पांत 20 टक्के घरे दिली जावीतप्रस्तावित मेट्रो 3 च्या विधान भवन स्टेशनला महर्षि बाल्मिकी चौक विधानभवनअसे नामकरण करण्यात यावेअशा विविध मागण्यांबाबत अधिवेशनात चर्चा करुन ते ठराव मंजूर करण्यात येणार आहेतमंजूर झालेल्या ठरावांचा केंद्रशासन आणि राज्य शासन पातळीवर पाठपुरावा केला जाणार आहे
    अधिवेशनाच्या दरम्यान ठाण्याच्या महापौर सौमिनाक्षी शिंदे उपस्थित राहणार असून समारोपाला ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदेआमदारप्रताप सरनाईकआमदार निरंजन डावखरेठाणे मनपा विरोधी पक्षनेते मिलिंद पाटीलज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळेस्थानिक नगरसेविका सौनम्रता कोळीनगरसेविका पलल्वी कदमनगरसेवक सुधिर कोकाटेनगरसेवक सुनिल हंडोरेमाजी नगरसेवक मुन्ना बिष्टभैय्यासाहेब इंदिसे आदीमान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad