बदलापुर नंतर आता पुण्यातही येत आहे "ताईज् किचन"
उद्या कात्रज येथे भव्य उद्घाटन सोहळा
पुणे - बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- राष्ट्रवादीचे तरुण तडफदार नगरसेवक व गटनेता कॅप्टन. आशिष दामले यांच्या संकल्पनेने अल्पदरात जेवण देणारे ताईज् किचन बदलापूर पश्चिम येथील बेलवलीत सुरु झाल्यापासुन नागरिकांमध्ये ताईज् किचन मध्ये 5 रुपयात पौष्टीक जेवण करण्यासाठी गर्दी करु लागले. पुर्णतः हाईजिनिक, पौष्टीक व चविष्ट जेवण करण्यासाठी सामान्य नागरिकच नव्हे तर राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना व इतर पक्षाचे विविध शहरातील नेता मंडळींनी सुद्धा ताईज् किचनला उपस्थिती लावली. ज्यामुळे कॅ. आशिष दामले यांची संकल्पना संपुर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना आवडली असुन ताईज् किचनचे आता विविध शहरात नविन आऊटलेट सुरु होणार असल्याचे समजते.
ताईज् किचनची पहिली शाखा ही पुणे शहर कात्रप येथील भारती विद्यापीठाच्या मागे त्रिमुर्ती येथे सुरु होत असुन उद्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ताईज् किचनचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडणार नाही.
बदलापुर नंतर पुण्यात ताईज् किचन ही तर फक्त सुरुवात असुन लवकरच संपुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शहरात ताईज् किचन सुरु करण्याचा आमचा मानस आहे असे कॅ. आशिष दामले यांनी बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले.
तरी उद्या दि. 3 जानेवारी रोजी ताईज् किचनच्या उद्घाटन प्रसंगी कात्रज परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहुन उद्घाटन सोहळा कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच जेवणाचा आस्वाद घ्यावा असे खासदार सौ. सुप्रियाताई सुळे व यशस्विनी सामाजिक संस्थेने आवाहन केले आहे.

No comments