Header Ads

  • ताजा खबरें

    किरकोळ वादावरुन सख्या भावाची हत्या ; अंबरनाथ येथील घटना

    murder by brother incident took place in ambernath news badlapur vikas अंबरनाथ (बदलापुर विकास मिडिया)- किरकोळ वादावरुन अंबरनाथ लेबर कॉलनी येथे वीरेन हरिजन ने आपल्या सख्या भावाची पोटात स्क्रु ड्रायव्हरने खोपसुन हत्या केली. 24 तासाच्या आत अंबरनाथ पोलिस व उल्हासनगर क्राईम ब्रांचने आरोपीला अटक केल्याचे समजते.
    अंबरनाथ लेबर कॉलनी पेरुमलच्या घराजवळ राहणार्या विरेन हरिजन व गणेश हरिजन हे राहत होते. काही दिवसांपासुन त्या दोघांमध्ये किरकोळ विषयावरुन भांडण होत होते. भांडणाचा राग मनात धरून वीरेन हरिजन ने रागाच्या भरात स्क्रु ड्रायव्हरने गणेश हरिजन याची निघृण हत्या केली.
    मृत च्या पत्निच्या तक्रारीवरुन अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असता आरोपी फरार झाला होता. ज्यामुळे उल्हासनगर क्राईम ब्रांच चे प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांच्या दोन टिम गठित करुन आरोपीचा कसोशीने शोध घेण्यात आले असता आरोपी आर्डनेन्स फैक्ट्री च्या जंगलात लपला होता. महेश तरडे सह अंबरनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक युवराज सालगुडे, कृष्ण नवले, गणेश तोरगल व इतर पोलिसांनी जंगलात शोध कार्य सुरु केले असता वीरेनला पोलिस आल्याचे समजतात तो पळण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी पोलिसांनी आरोपीचे मुसके आवळत 24 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad