Header Ads

  • ताजा खबरें

    संपुर्ण महाराष्ट्रात शिंदे विरोधात बोलणारर्या पत्रकारांवर भुंकणार्या कुत्र्यांचा सिलसिला

    जेव्हा मुख्यमंत्री शिंदें यांचे पोसलेले कुत्रेच पत्रकारांवर भुंकणार तर महाराष्ट्र पोलिस खातं कारवाई करणार तरी कोणावर


    मुंबई (महेश कामत)- भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे संपुर्ण भारतात निर्भिडपणे बातम्या प्रकाशित करणार्या पत्रकारांवर दबाव तंत्राचा वापर करते अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही पत्रकारांची दडपशाही अद्याप थांबलेली नाही. नुकताच बदलापूर येथे घडलेल्या महिला पत्रकारावरिल घटनेमुळे आता महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सुरक्षितते गंभिर प्रश्न ऐरवीवर आहे.


    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच सत्ते विरोधात बदलापूरची एक मागासवर्गीय निर्भिड महिला पत्रकार बातम्या प्रकाशित करते आणि त्या शहराच्या शिंदे गटातील लोकप्रतिनिधीला राग येतो. रागाच्या भरात हे महाशत पोलिस आणि इतर लोकांच्या समोर महिलेला अश्लिल हावभाव करत ‘जसा का तुझाच बलात्कार झालाय बातमी करायला…’ असे अपमानजनक वाक्य उच्चारुन निघून जातो. विशेष म्हणजे जेव्हा या विषयाची दखल सर्वत्र मिडियाद्वारे घेतली जाते त्यानंतर शिंदेचा मोरक्या यु टर्न मारत मी असं बोललोच नाही असे सांगत दिशाभुल करण्याचा प्रयत्न करतो. या लोकप्रतिनिधीचे नाव वामन बारकु म्हात्रे असे असुन याने केलेले हे कृत्य पाहुन रस्त्यावर भुंकणार्या कुत्र्याचे चित्र डोळ्यासमोर येतो. रस्त्याचा वार्यावर सोडलेला कुत्रा हा देखील अगदी अश्याचप्रकारे भुंकतो आणि जर कोणी जाब विचारयला कोणी थांबलं तर कुत्रा पळ काढतो. पण काय फक्त बदलापूर शहरातच शिंदे सरकारचे पोसलेले कुत्रे भुंकण्यासाठी आहेत का ?

    2023 साली याच महिन्यात ऑगस्ट मध्ये अगदी अश्याच प्रकारी घटना घडली. जळगाव जिल्ह्यात एका पत्रकाराला शिंदे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भर रस्त्यावर बेदम मारहाण केली. त्यावेळेस त्या पत्रकाराची फक्त एवढीच चुक होती कि त्याने सत्य परिस्थितीच्या आधारावर बातमी प्रकाशित केली, पत्रकारितेचे कार्य निर्भिडपणे केले.


    घटना होती महिलेच्या संरक्षणाबाबत आणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पिडीतेच्या घरी गेले होते अर्थातच अश्रु पुसण्यासाठी गेले होते. पत्रकाराने देखील अगदी तेच छापले मुख्यमंत्री शिंदे पिडीतेच्या अश्रु पुसण्यासाठी गेले म्हणुन आणि पोसलेल्या पाळिव कुत्र्यांना झटका लागला. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शिंदे गटातील कार्यकर्ते यांनी कायदा आणि सुव्यवस्था गेलं तेल लावत म्हणत पत्रकार महाजनला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण तर करतच होते परंतु त्यासोबत एक कार्यकर्ता व्हिडीओ सुद्धा तैयार करुन सोशल मिडियावर पोस्ट करुन दहशत माजवण्याच्या पुर्ण तैय्यारीत होती आणि तसे केले सुद्धा पण स्थानिक पोलिस प्रशासनाने फक्त एक एन.सी. नोंद करत महाराष्ट्रातील चौथ्या स्तंभाच्या इज्जतीचा पंचनामा केला.  पत्रकार बातमी छापताच त्याला बेदम मारहाण होते आणि गुन्हा दाखल होतो अदखलपात्र यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट या भारत देशात पहालयला मिळणार नाही. 


    भारतात पत्रकारांवर हल्ला होऊ नये म्हणुन घटनेत, कायद्यात अनेक तरतुद आहेत परंतु हे कायदा फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवण्यासाठीच असाव्यात कारण प्रत्यक्षात जर हे कायदे कार्यरीत असते तर भारतातील पोसलेल्या कुत्र्यांना पत्रकारांच्या अंगावर धाऊन येतांना थोडी भिती वाटली असती. परंतु त्याउलट व्हिडीओ करुन दहशत पसरविण्याचे कार्य पाहुन महाराष्ट्रात आणि भारतात पत्रकार अजुन किती वर्ष मार खात राहणार असा सवाल बदलापूर विकासचे महेश कामत यांनी विचारला आहे.


    ही दोनच घटना नाही तर अश्या हजारो घटना पोलिस डायरीत धुळ खात आहे. काल दि. 28 ऑगस्ट रोजी नारायण राणे हे वरिष्ठ नेते एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा बुक हिसकावण्याचा प्रयत्न करतात. त्याट रस्तागिरीत झालेल्या पत्रकार कै. शशिकांत वरिशे हत्याकांड प्रकरण अटक आरोपी आजही कोर्टात सुटकेसाठी पुरेपुर पैश्याची ताकद वापरुन साक्षिदाराची दिशाभुल व संपुर्ण घटनेची फेरफार कोर्टाला दाखवण्याच्या प्रयत्न करत मी तो नव्हे चा सोंग कर आहे. सदर आरोपी हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जवळचा असल्याचे बोलले जाते. शिंदे आणि फडणवीस यांच्या गटातील हे कोणत्या 'ब्रिडचे' समर्थक महाराष्ट्र राज्याला लाभले आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्री यांचे पोसलेले कुत्रेच पत्रकाराच्या अंगावर धाऊन येणार आणि भुंकणार तर महाराष्ट्र पोलिस खातं कारवाई करणार तरी कोणावर?


    पत्रकाराच्या रक्षणासाठी घटनेत आर्टकल 19 (1)(अ) आणि आर्टिकल 21 ची तरतुद आहे. इतकेच नाही तर रक्षणासाठी 1978 साली स्थापित झालेले प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया ही आहे. तसेच 1860 सालचे भारतीय पिनल कोट कलम सेक्शन 124 अ, सेक्शन 499 / 500 आणि सेक्शन 503 आहे. हास्यास्पद म्हणजे सेक्शन 499 / 500 पत्रकाराच्या रक्षणासाठी कधी वापरला जात नाही त्याऐवजी त्याच्या विरोधातच अनेकदा वापरला जाते. रक्षणासाठी एवढेच कलम आणि तरतुद नाही तर 1993 सालातील प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अॅक्ट देखील आहे. पण काय करणार आपल्या देशाच्या एन.एच.आर.सी. ची अवस्था पाहुन मागील दोन वेळेस अमेरिकेने त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. इतकेच नाही तर पत्रकार भ्रष्टाचार एक्सोस करतो म्हणुन व्हिसलब्लोअर प्रोटेक्शन अॅक्ट सुद्धा आहे परंतु ते देखील पोलिसांनी किती पत्रकारांच्या संरक्षणासाठी वापरले आहे हा संशोधनाचा भाग आहे. इतकं कागदोपत्री पत्रकारांना प्रोटेक्शन असतांनाही भारताचा पत्रकारील हल्ले कमी झाले नाही म्हणुन 2017 साली महाराष्ट्र मिडिया पर्सन एण्ड मिडिया इस्टिट्युशन (प्रिवेंशन ऑफ वॉयलेंस एण्ड डैमेज ऑर लॉस टू प्रॉपर्टी हे बिल देखील आणण्यात आले पण एवढे करुन देखील सत्ताधारी सरकार बिल आणतांना त्याचवेळी त्यांच्या पाळलेल्या कुत्र्यांना समजत नाही की हल्ले करु नका त्यामुळे भारताचा हा पत्रकार अजुन किती काळ जिवघेणा हल्ल्याने त्रासुन बातम्या प्रकाशित करणार?


    अश्यामुळेच जेव्हा सत्ताधारी विरोधात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात बातमी प्रकाशित केल्या म्हणुन गावगुंड लोकप्रतिनिधींना हिम्मत वाढते. भुंकणार्या कुत्र्यापासुन पळणार्याच्या मागे तो कुत्रा अजुन वेगाने लागतो हे ज्यादिवशी महाराष्ट्रातील आणि भारतातील तमाम पत्रकारांना कळेल त्यादिवसापासुन भुंकणार्या कुत्र्यांचा सिलसिला बदलेल.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad