Header Ads

  • ताजा खबरें

    'दोन काय दहा कोटी खर्च ही कमीच आहे' -नारायण राणे यांच्या प्रतिक्रियेनंतर भ्रष्टाचार भविष्यात थांबवणार याची जनतेला खात्री नाही

    मालवण (बदलापूर विकास मिडिया)- नुकताच मालवण येथील महाराजांचा निकृष्ट दर्जेचा पुर्णाकृती पुतळा वार्यामुळे कोसळल्याने संपुर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. विरोधकांनी थेट शिंदे सरकार व भाजप विरोधात टिकासत्र सुरु केले असुन त्यातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी राहुल यांनी आपल्या सोशल मिडिया मध्ये पुतळ्यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आले. तसेच त्याचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येणार म्हणुन तात्पुरते हेलीपॅड बनविण्यासाठी कुडाळ येथील अक्युरेट इन्फ्राप्रोजेक्टस एल.एल.पी. कंत्राटदाराला कोटी रुपये खर्च झाल्याची पुराव्यासह माहिती दिल्यानंतर शिंदे सरकारचा भ्रष्टाचार जनतेसमोर उघडकीस आला आहे.

    यावर नुकताच मिडियाशी बोलतांना ज्येष्ठ नेते नारायण राणे म्हणतात कि, भारताचे पंतप्रधान उद्घाटन करण्यासाठी येतात हे भाग्य समजावे त्यासाठी दोन काय दहा कोटी रुपये ही सुद्धा खर्च झाल्यास ते करु. देशाचा बजट मोदींनी कोट्यावधींत न्हेला आहे असे सांगितले.


    नारायण राणे यांच्या अश्या विधनामुळे महाराष्ट्र राज्यातील भ्रष्ट कारभार भविष्यात थांबणार याची काही जनतेला खात्री राहिली नाही. भ्रष्टाचाराविषयी गंभीरतेने आपण चौकशी करु असे सांगण्याऐवजी जेव्हा सत्ताधारी थेट दोन काय दहा कोटी खर्च करु म्हणणार्या राजकिय नेत्यांना जनतेच्या पैश्यांचा कशाप्रकारे वापर करण्यात येतो हे दिसुन येते. 


    नारायण राणे यांनी नुकताच या सर्व एक एक घटना घडतांना पोलिसांशी बाचाबाची तसेच पत्रकाराचा माइक हिस्काउन घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मालवण येथील पत्रकार जोवर राणे माफी मागत नाही तोवर बहिश्कार टाकणार अशी चर्चा होती परंतु तसे न झाल्याने मालवणची पत्रकार संघटना सुद्धा या विषयात किती गांभिर्याने आहे हे दिसुन येते. मुळात पत्रकारच सुरक्षित नाही मग महाराष्ट्र राज्यातील जनतेचा पैसा काय सुरक्षित राहणार असे मत बदलापूर विकास व्यक्त करत आहेत.


    या सगळ्या प्रकरणामुळे आता पंतप्रधान उद्घाटनासाठी येणार म्हणुन जेव्हा सरकारच्या तिजोरीतुन कोट्यावधी रुपये तात्पुरत्या हॅलीपॅडसारख्या कामात वाया जात असुन हे योग्य आहे का यावर जनतेने उत्तर दिले पाहिजे


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad