शिक्षणमंत्र्यांच्या हलगर्जीपणामुळेच शिक्षक शाळेत कमी व आझाद मैदानात जास्तवेळ आढळतात - आमदार डॉ मनीषा कायंदे
मुंबई : कायम विनाअनुदानित शाळांच्या लक्षवेधीच्या मुद्यावर शिक्षक
गेली ७ ते ८ वर्ष शाळेत कमी आणि आझाद मैदानात जास्त असतात. त्यामुळे शिक्षक
आणि शिक्षणाची काय अवस्था असेल, असा आरोप शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे
यांनी आज गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी तिसऱ्या दिवशी अधिवेशनात केला. आझाद
मैदानात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांचा कायम अनादर करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना
आमदार डॉ मनीषा कायंदे व इतर शिक्षक आमदारांनी उलट सुलट प्रश्न
विचारल्यावर चांगलीच भंबेरी उडाली. विनाअनुदानित शाळेच्या प्रश्नांवर
उत्तर नसल्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे सभागृहात चांगलेच आक्रमक
झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आक्रमक झालेल्या शिक्षण मंत्र्यांना आपण
सभागृहात काय बोलतो याचे भान न राहिल्याचे चित्र सभागृहात दिसले. याविषयी
अधिक माहिती देताना शिवसेनेच्या आमदार डॉ मनीषा कायंदे म्हणाल्या, "
विनाअनुदानित शाळेच्या प्रश्नाचे बिलकुल गांभीर्य नसल्यामुळे शिक्षणमंत्री
विनोद तावडे यांनी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला याउलट फक्त हजार
बाराशे शिक्षक आंदोलन करत असून सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा दिला ,
परंतु सर्वच शिक्षक आमदारांनी या लक्षवेशी प्रश्नांची उचल केली असता मी
मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्याशी बोलून यावर उपाय काढतो असे आश्वासन
त्यांनी दिले."
मनीषा कायंदे या सभागृहात नवख्या असल्याने
त्यांना सभागृह समजायला वेळ लागेल, अशी खोचक टीका करणाऱ्या शिक्षणमंत्री
विनोद तावडे यांना शिक्षणमंत्रीपदाची चार वर्षे संपली तरी अजूनही
शिक्षकांचे मूलभूत प्रश्न त्याना नवखे तर वाटत नसतील ना अशी उपरोधिक टीका
शिवसेनेच्या आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी केली.

No comments