शहर विकास प्रतिष्ठान पब्लिक ट्रस्ट अंबरनाथ व सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने "मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया" शिबि
अंबरनाथ- शहर विकास प्रतिष्ठान पब्लिक ट्रस्ट अंबरनाथ व सत्यसाई प्लॅटिनम
हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने "मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया"
शिबिराचे आयोजन आज रविवारी अंबरनाथ पश्चिमेकडील चलवादी समाजसेवा संस्था,
तायम्मा मंदिर, घाडगेनगर याठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी, नगरसेवक संदीप भराडे,
आमदार नरेंद्र पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, नगरसेवक
उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे सन्मानचिन्ह,
शॉल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी मोफत
तपासणी करून घेतली असून त्यांना मोफत औषधे देखील देण्यात आलेली आहे व ८-१०
लोकांना शस्त्रक्रियाकरिता पाठविण्यात आलेले आहे. अशी माहिती शहर विकास
प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद चलवादी व सचिव महादेव लोटे यांनी पत्रकारांना
दिली.
या शिबिरात रक्तदाब, सोनोग्राफी,
किडनी स्टोन, मधुमेह, २ डी इको, ईसीजी, एनजीओग्राफी, एनजीओ प्लास्टी, किडनी
स्टोन शस्त्रक्रिया, बायपास शस्त्रक्रिया, व्हाल रिप्लेसमेंट
शस्त्रक्रिया, ब्रेन सर्जरी, न्यूरो सर्जरी आदीची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे आयोजन शहर विकास प्रतिष्ठानचे संस्थापक - अध्यक्ष
प्रसाद चलवादी, सचिव महादेव लोटे, खजिनदार सुरेश लोहकरे, उपसचिव प्रमोद
सिंगनूरकर, सदस्य गणेश आल्हाट, राहुल नागदा, संदीप तेलंगे, हरेश साठे, हनिफ
कोस्टामेदी, नवीन चलवादी, गोपाळ मेकल आदींनी केले होते.
आलेल्या मान्यवरांनी शहर विकास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या
आरोग्य तपासणी शिबीर व शस्त्रक्रिया शिबिराचे कौतुक करत पुढील वाटचालीस
त्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments