Header Ads

  • ताजा खबरें

    सत्तेवर येण्यासाठी मोदी सरकारने नागरिकांची केली दिशाभूल

    अंबरनाथ-मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपाने देशात सत्ता मिळवली असली तरी त्यांची ही सत्ता त्यांच्याच अंगलट आली आहे. निवडणुकीच्या पूर्वी सर्वसामान्य नागरिकांना जी खोटी आश्वासने दिली त्याची पूर्तता करता करता भाजपाच्या नाकी नऊ आले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील जनता भाजपाला योग्य दिशा दाखवतील असा विश्वास काँग्रेसचे कोकण विभागीय प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांनी व्यक्त केला आहे.
           कल्याण लोकसभा क्षेत्र आणि अंबरनाथ विधानसभा क्षेत्र मधील काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संदीप हे अंबरनाथमध्ये आले होते. अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या इंदिरा भवन कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी मोदी सरकारवर विरोध केला. मोदी सरकार म्हणजे एकाधिकार सरकार आहे, इतरांना कधीच महत्व दिले जात नाही. मोदी सरकारने सत्तेवर येण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली आहे. त्यांनी दिलेली खोटी आश्वासने ही आता भाजपा सरकारला पूर्ण करणे शक्य होत नाही.  सर्वाधिक महागाई ही भाजपाच्या कार्यकाळात झाली आहे. पेट्रोल डिझेल घरगुती गॅस यांचे वाढलेले दर हे सर्वज्ञात आहेत. त्यामुळे भाजपा सरकारला आम जनता वैतागली असून या खोटारड्या सरकारला चोख उत्तर आगामी निवडणुकीत नागरिकच देतील असा विश्वास संदीप यांनी व्यक्त केला. सरकारच्या फसलेल्या योजना आणि त्यांचे अपयश हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. मोदी सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मित्रपक्षांना सोबत घेण्याची रणनीती आखण्यात आलेली असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीची वाट न पाहता आपापल्या परीने योग्य पद्धतीने काम सुरू करावे तसेच उमेदवार कोणीही असला तरी भाजपाला दूर ठेवण्यासाठी एक दिलाने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. 
                या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश टावरे, सुभाष कानडे,अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत जोशी, विजयन नायर, नगरसेवक विलास जोशी, उमेश पाटील, सुरेंद्र यादव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad