मुरबाड नगरपंचायत इमारतीच्या डॉक्टरच्या गाळ्यात ‘मायकलचा जुगाराचा अड्डा’
मुरबाड पोलिस ठाण्याचे पो.नि. अजय वासवे का कारवाई करत नाही?
मुरबाड (प्रतिनिधी/महेश कामत)- परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी उल्हासनगर मधील अनधिकृत्तपणे चालणार्या जुगाराच्या अड्ड्यांवर कडक व धडक कारवाई केल्यानंतर मायकल नावाच्या जुगार चालविणार्या छिछोर्याने आता त्याचा जुगाराचा अड्डा मुरबाड मध्ये स्थलांतरीत केल्याचे सुत्रांकडून समजते. मायकल हे नाव जुगार चालविणार्या, जुगार खेळणार्या आणि जुगाराच्या अड्ड्यावर धाड मारणार्या पोलिसांना चांगल्याच प्रकारे माहित आहे. काही महिन्यांपुर्वी जेव्हा दै. बदलापूर विकासने मायकलच्या उल्हासनगर मध्ये चालणार्या जुगाराच्या अड्ड्याविरोधात कारवाई का होत नाही अशी बातमी प्रकाशित केली होती त्यानंतर तत्कालिन पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांच्या आदेशावरुन मायकलच्या जुगाराच्या अड्ड्यावर धडक कारवाई करण्यात आली. उल्हासनगर येथे चालत असलेल्या त्या जुगाराच्या अड्ड्यात उल्हासनगर शहर, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत व इतर शहर व ग्रामिण क्षेत्रातुन जुगारी जुगार खेळण्यासाठी येत होते. पोलिसांनी छापा मारतांना जुगार खेलणार्यांवर देखील कारवाई केली होती. आता उल्हासनगर येथील जुगाराचा अड्डा बंद झाल्याने ‘मायकल’ ने आपले संपुर्ण बस्तान मुरबाड शहरात मांडुन मुरबाड शहरातील बेरोजगार तरुणांना भिखारी करण्यासाठी जुगाराचा अड्डा सुरु केला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड पोलिस स्टेशन पासुन 1 कि.मी. अंतरावरच तसेच मुरबाड नगरपंचायतीच्याच गाळ्यात मायकल ने आपला जुगाराचा अड्डा सुरु केला असुन पोलिसांच्या नाकाला टिच्चुन मायकलने जुगाराचा अड्डा सुरु केल्याची मुरबाड मध्ये चर्चा आहे.
विशेष म्हणजे सदर गाळा नगरपंचायतीच्या इमारतीच्या गाळ्यात एका खानावळच्या वरती असुन सदर गाळा एका डॉक्टरचा असुन त्याठिकाणी पुर्वी थेरपी शिबिर होत होते, परंतु आता त्याठिकाणी मायकलचा जुगाराचा अड्डा बिंधास्त पणे चालतो. ज्यामुळे डॉक्टर ने अश्या प्रकारचा धंडा सुरु करण्यासाठी मायकल कडुन किती रुपये घेतले आहे कि जुगाराच्या अड्ड्यात भागीदारी घेतली आहे याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे.
सर्वात जास्त पत्रकार असलेल्या मुरबाड शहरात जुगाराचा अड्डा बंद करण्यास का आहे ‘पत्रकार असमर्थ’?
दै. बदलापूर विकासचे कार्यकारी संपादक महेश कामत यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले कि, आज मुरबाड शहरात उल्हासनगर प्रमाणेच भरपूर प्रमाणात पत्रकार आहेत, इतके पत्रकार असतांना सुद्धा मुरबाड शहरात चालणार्या जुगाराचा अड्ड्याविरोधात बातमी प्रकाशित करणे किंवा अड्डा बंद पाडण्यास का समर्थ आहे? असा प्रश्न कामत यांनी विचारला आहे.पोलिस निरीक्षक अजय वासवे यांनी जुगाराच्या अड्ड्याबाबत कल्पना नाही?
मुरबाड क्षेत्रफळानुसार छोटा शहर असुन स्थानिक मुरबाड पोलिस व मुरबाड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजय वासवे यांनी सदर अनधिकृत्तपणे चालणार्या जुगाराच्या अड्ड्याबाबत माहिती नाही का? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. मुरबाड शहरात कुठेही काही झाले तर ज्याप्रमाणे मुरबाड पोलिस सावध होतात व कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हालचाली करतात मग पोलिस स्टेशन पासुन 1 कि.मी. वर असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारुन कारवाई का करण्यात येत नाही? असा ही प्रश्न सुज्ञ नागरिक विचारत आहेत.आज मुरबाड मध्ये सदर जुगाराच्या अड्ड्यामुळे अनेक तरुण बेरोजगार भिखारी झाले आहेत, कडीया मजदुर व दारुडे आपल्या मेहनतीचे पैसे जुगारात हरुन घरी बायका पोरांना मारहाण करत आहेत, मुरबाड शहराचे नाव सदर जुगाराच्या अड्ड्यामुळे खराब होत आहे तरी लवकरात लवकर सदर जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई व्हावी म्हणुन दैनिक बदलापूर विकासचे कार्यकारी संपादक महेश कामत यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केले आहे.


No comments