शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाराम कांबरी यांचा आज वाढदिवस
वाढदिवसानिमित्त विविध शिबिराचे मोफत आयोजन
बदलापूरः- शिवसेना पक्षाचे अंबरनाथ तालुकाप्रमुख मा. श्री. बाळाराम कांबरी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल त्यांच्या चायत्यांनी व कार्यकर्त्यांनी मोफत वैद्यकिय शिबिराचे आयोजन केले कोलो होते.सदर शिबिरात मोफत डोळे तपासणी, मोफत मोतीबिंदु ऑपरेशन व मोफत चष्मे वाटप काल करण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी करुन सर्व रोगांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आले. मोफत औषधोपचार आणि अग्निकर्म, अॅनिमिया, रक्टगट तपासणी तसेच मोफत इसीजी स्ट्रेसटेस्ट तपासणी देखील करण्यात आले. सदर वैद्यकिय शिबिर बी.आर. हरणे हॉस्पिटल (काराव) च्या सौजन्याने करण्यात आले असुन काल दि.13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते साय. 4 वाजेपर्यंत शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेतला.
बाळाराम कांबरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्लाझ्मा ब्लॅड बैंकच्या वतीने मोफत रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते सायं. 7 वाजेपर्यंत शिबिरा रक्तसंकलन करण्यात येईल.
बाळाराम कांबरी यांचे सर्व पक्षांशी मधुर संबंध, कार्यकर्त्यांशी व शिवसेना पक्षाशी एकनिष्ठता व नागरिकांना वेळोवेळी सहकार्य करण्याची वृत्तीमुळे संपुर्ण अंबरनाथ तालुक्यात बाळाराम कांबरी अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या वाढदिवस जरी आज असला तरी कालपासुन त्यांच्या कार्यालयात व सोळ मिडियामध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.
No comments