Header Ads

  • ताजा खबरें

    सरकारी घरकुल योजनेतील गरीबांना न्याय आणि हक्काचे घर देण्यासाठी राष्ट्रवादी करणार बेमुदत उपोषण

    बदलापूरः- बी.एस.यु.पी. सरकारी घरकुल योजनेतील गोरगरिबांची त्यांच्या हक्काची घरे त्यांना देण्यासाठी म्हणुन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बुधवार 21 नोव्हेंबर रोजी नगरपालिका कार्यालया समोर सकाळी 10 वाजल्यापासुन बेमुदत उपोषण करणार.
    भ्रष्टाचाराच्या दलदलात बुडालेली कुळगांव बदलापूर नगरपरिषदेने मतदारांचा, नागरिकांचा तसेच गोरगरिब जनतेचा कधीच विचार केलेला नाही. अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेली घरकुल योजनेतील घरे गोरगरिबांना अद्याप वाटप करण्यात आली नसुन फक्त योजनांच्या नावाने नागरिकांची फसवणुक करुन त्यांच्याकडुन कर वसुल करण्यापलीकडे कुळगांव बदलापूर नगरपरिषद दुसरे काही एक करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया सेल राज्य प्रतिनिधी अविनाश देशमुख यांनी बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले. ते पुढे म्हणाले कि, गरिबांच्या हक्काची घरे त्यांना मिळवुन देण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला आता रस्त्यावर उतरण्याची पाळी आली तरी चालेल आम्ही जनतेला त्यांच्या हक्काची घरे मिळवुन देण्यासाठी बुधवार पासुन बेमुदत उपोषण करणार आहत. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, नगरसेवक, शिष्ट मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बेमुदत उपोषण होणार असुन जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, योजनेतील लाभार्थी व जनतेने सहभागी व्हावे जेणेकरुन प्रशासनाला जाग आल्याशिवाय राहणार नाही असे ते शेवटी म्हणाले.
    अविनाश देशमुख यांच्या समवेत दिपक लढे, अनघा वारंग, सचिन पाटील, अनिता पाटील, अनिता नवले, कविता पाटील, पुजा शार्दुल, अजिज एडणवाला, पंकज साठे, भुषण कुलकर्णी, अक्षय भाटकर, मंगेश जाधव, प्रशांत गायकवाड, पल्लवी गोपाळ व इतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी बेमुदत उपोषणाच्या तैयारीला लागल्याचे समजते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad