Header Ads

  • ताजा खबरें

    मुरबाड येथील जुगाराचा अड्डा झाला बंद (BADLAPUR VIKAS NEWS EFFECT)

    नागरिकांनी मानले मुरबाड पोलिसांचे आभार

     BADLAPUR VIKAS NEWS EFFECT

    मुरबाडः- दैनिक बदलापूर विकास ने नुकताच मुरबाड येथे मायकलचा जुगाराचा अड्डा या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली व बदलापूर विकासच्या बातमीची मुरबाड पोलिसांनी दखल घेत मुरबाड येथील ‘त्या’ ठिकाणी सुरु असणार्‍या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारुन मारल्याने मुरबाड मधील बेरोजगारांना भिखारी करणारा व जुगार्‍यांचा अड्डा असलेला मायकलचा जुगाराचा अड्डा तुर्तास बंद झाला आहे.
    मुरबाड येथील अनेक नागरिकांनी बदलापूर विकासला तक्रार केल्यानंतर बदलापूर विकास ने दि.   रोजी बातमी प्रकाशित केली व कार्यकारी संपादक महेश कामत यांनी सदर जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याच्या हेतुने मुरबाड पोलिस स्थानकात तक्रार केली होती. बातमी प्रकाशित झाल्याच्या काही तासातच पोलिस यंत्रणांनी कारवाई केल्याने आता मुरबाड शहरात जुगाराचा अड्डा बंद झाल्याने अनेकांनी सुट्केचा निश्‍वास घेतला आहे.
    सदर जुगाराचा अड्डा बंद करण्यासाठी मनसेचे देसले व इतर सामाजिक संघटनांनी देखील पुढाकार घेतला होता. गमतीचा विषय म्हणजे जुगाराच्या अड्ड्याविरोधात बातमी प्रकाशित केल्यानंतर जुगार चालविणार्‍याने पत्रकाराविरोधात विष ओकणे सहाजिक होते परंतु मुरबाड मध्ये वेगळेच चित्र पहायला मिळाले. मुरबाड मधील दोन पत्रकारांनी ग्रुपवर सदर बातमीबाबत नाराजी व्यक्त करत बदलापूर विकास वरच टिका करण्यास सुरुवात केली. परंतु मुरबाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासवे यांनी कर्तबगारिने कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देत सदर ठिकाणी असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली असुन भविष्यात जुगाराचड्डा किंवा कोणत्याही प्रकारची अनैतिक धंदे मुरबाड मध्ये सुरु होऊ नये म्हणुन योग्य ती काळजी देखील घेतल्याचे समजते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad