Header Ads

  • ताजा खबरें

    ईगल फाउंडेशन चा कातकरी समाजासाठी सामाजिक उपक्रम

    25 कुटुंबाना मिळाला रोजगार
    वसंत पानसरे,शहापूर- शहापूर तालुक्यातील वेहलोली बु गावातील 25 कातकरी कुटुंबासाठी मुंबई येथील ईगल फाउंडेशन ने सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. या कातकरी वाडीतील 18 कुटुंबाला 25 ते 30 हजाराच्या शेळ्या देऊन उत्पन्नाचे साधन तयार करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वर्षीनुवर्षं दारिद्र्यात असलेले व कोणतेही उत्पन्नाचे साधन नसलेल्या कातकरी कुटुंबाला यामुळे रोजगार तयार झाला आहे. मुख्य म्हणजे वेहलोली बु गावाला हिवरे बाजार गावसारखे करण्यासाठीच्या  गावकर्‍यांच्या स्वप्नपूर्ती ला यामुळे हातभार लागत आहे. ईगल ही मुंबई येथे कार्यरत असणारी फाऊंडेशन आहे. मिळालेल्या सर्वंनुसार शहापूर तालुक्यात त्यांनी जवळ जवळ 25 गावात उपक्रम सुरू केले असून यावर्षी वेहलोली बु गावातील कातकरी वाडीचा समावेश केला आहे. या वाडीतील 18कातकरी कुटुंबाला शेळ्या ची जोडी देऊन त्यांच्या साठी प्रशिक्षण दिले .मार्केटिंग व संगोपन ची पुरेशी माहिती देऊन त्यांना रोजगाराची माहिती दिली. त्यानुसार या कातकरी वाडीतील प्रत्येकाच्या घरासमोर काळ्या रंगाच्या शेळ्या दिसत असून शेण खत दिसत आहे. त्यातच पावसाळी फळझाडे देऊन फळ उदयोग व रोजगार साठी प्रोत्साहित केले आहे. ईगल फाउंडेशन चे डॉ निलरतन शेंडे हे या कातकरी वाडीत लक्ष ठेऊन असून या लोकांना विविध माहिती ते देत आहेत.दरम्यान आदिवासी विकास प्रकल्प ने या गावात ठक्कर बापा योजनेतून सिमेंट रस्ता दिला असला तरीही रोजगार निर्मितीसाठी ईगल फाऊंडेशन ने घेतलेला पुढाकार वाखाण्यजोग आहे. लवकरच या ईगल फाउंडेशन च्या संचालकांचा वेहलोली बु येथील कातकरी वाडीत सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती वेहलोली चे सामाजिक कार्यकर्ते योगेश हजारे यांनी सांगितली आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad