Header Ads

  • ताजा खबरें

    २८ वर्षांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यात फरारी झालेल्या दाउद गँगंचा गँगस्टरला ठाणेगुन्हेशाखा, घटक ०१ ठाणे कडून अटक


    मोहम्मद अहमदखान महाडिक याने 28 वर्षापूर्वी एका दुसऱ्या गँगच्या हैदर नावाच्या  इसमाचा खुन केला होता व त्याबद्दल न्यायालयातून जामिनावर सुटल्यावर खोटा पासपोर्ट बनवुन मस्कत येथे पळुन गेला होता , 9 महिन्यापूर्वी तो मस्कत वरून मुंब्रा येथे राहण्यास आला होता , ठाणे क्राईम ब्रांच यूनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना याची खबर लागताच त्यांनी मोहम्मद महाडिक याला अटक केली .

    मोहम्मद महाडिक हा रहायला कुर्ला येथील नेहरू नगर येथे होता , तेथे त्याच्या  तिन चार मित्रांससमवेत तो एयरपोर्ट येथे लोडिंग अन लोडिंगच़ काम करत होता , त्यावेळी समोरील प्रतिस्पर्धी असलेल्या व्यक्तीशी त्याची हमरीतुमरीवर होऊन त्या वादातून हैदर या इसमाचा महाडिक याने खुन केला , त्यावेळी दाऊद गँग संलग्न होती छोटा राजन गंँग , गवळी गंँग एकत्रच काम करत होते  , दाऊदची बहीण हसीना पारकर खेड तालुक्यातील साखरोची इथल्या गावातली होती , आणि त्या पारकर फँमिली मध्ये मोहम्मद महाडिक याच्या दोन बहिणीची लग्न झाली होती , त्यामुळे दाऊद गंँग शी त्याचे  चांगले सबंध होते , दाऊदच्या गंँगच्या आणि छोटा राजन गंँगंच्या गुंडांबरोबर त्याचे उटणेबसणे होते , कुर्ला भागात याची बरीचशी दहशत होती , बॉडी ऑफेन्स , खंडणी , मारहाण अशा प्रकारच्या नऊ केसेस त्याच्यावर होत्या , मिसा चा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता , हैदर नावाच्या गुंडाचा खुन केल्यानंतर तो जेल मध्ये गेला होता , जेल मधुन जामिनावर सुटल्यानंतर त्याने कर्नाटक येथुन पठाण युसूफ खान उस्मान मुक्काम पोस्ट दांडेली ग्लोबल झेरॉक्स एस सेंटर ईन रोड , उत्तर कन्नडा कर्नाटक राज्य अशा खोट्या पत्याने पासपोर्ट बनवुन 2001 मध्ये मस्कत येथे पळुन गेला होता ,तिथे गेल्यानंतर तिथे कपड्याच्या दुकानात कामाला लागला होता , त्याचे लग्न झालेल असल्यामुळे त्याने बायकोला तलाक दिला होता , आणि काही वर्षापूर्वी त्याने दुसऱ्या महिलेशी निकाह केला होता व  बायकोला मस्कतला बोलऊन घेतल होत , आणि नऊ महिन्यापूर्वी तो बायकोला घेउन मस्कत सोडुन मुंब्रा येथे रहायला आला होता , त्याला वाटले होते या सर्व घटनेला 28 वर्ष उलटून गेल्यामुळे आपल्याला कोणी ओळखणार नाही ,आणि इथेच तो फसला कानून के हाथ लंबे होते है ! याची त्याला प्रचिती आली आणि तो ठाणे क्राईम ब्रांचच्या हातात सापडला आणि त्याच्या वर खोठा पासपोर्ट बनवून त्याचा वापर केल्याचा गुन्हा दाखल झाला .

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad