रुग्णमित्राच्या हस्ते मध्यवर्ती रुग्णालयास घड्याळ भेट
दिव्यांग कार्यकर्ते ने आपल्या नेत्याचा वाढदिवस केला साजरा
उल्हासनगर शहरात अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत आपले जीवन जगत असलेल्या दिव्यांग कार्यकर्त्याने आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना रुग्णमित्राच्या हस्ते मध्यवर्ती रुग्णलय 3 यांच्या कडे घड्याळ भेट म्हणून दिलेपँथर चळवळीपासून उल्हासनगर शहरात रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांचा निष्ठावंत ,खदा समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे अश्या चंद्रकांत कांबळे यांनी भारत सरकार चे केंद्रीय राज्य मंत्री ना रामदास आठवले साहेब यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्याला संजय गांधी निराधार योजना अनुदानातून घड्याळ विकत घेऊन आपला जुनामित्र पँथर रुग्णमित्र भरत खरे यांच्या हस्ते त्या घड्याळ रुग्णालयाचे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ सुधाकर शिंदे साहेब ,अति जिल्हाशल्यचिकित्सक डॉ जाफर तडवी साहेब यांच्या कडे सुपूर्द केल्या
या प्रसंगी रुग्णमित्र राजू तेलकर,रुग्णसेवक गजानन तायडे ,रुग्णसेवक कैलास झालटे आदी उपस्थित होते

No comments