Header Ads

  • ताजा खबरें

    अंबिका योग कुटीरचा कॅन्सर सपोर्ट ग्रुप 25 डिसेंबरला योग व कॅन्सर शिबीर

    ठाणे, दि. 21 - हठयोगी निकम गुरुजी संस्थापित अंबिका योग कुटीर या योगविषयक संस्थेच्या वतीने कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या सर्व साधकांना एकत्रित आणून त्यांना विशेष मार्गदर्शन व्हावे व अन्य कॅन्सरग्रस्तांना दिलासा मिळावा या उद्देशाने 25 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत बी. के. मिल कंपाऊंड, कॅसल मिल, ठाणे (पश्चिम) येथील अंबिका योग कुटीरमध्ये योग व कॅन्सर शिबीर आयोजित केले आहे, अशी माहिती अंबिका योग कुटीरचे जनरल सेकेटरी रामचंद्र सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे खजिनदार अनंत कुलकर्णी, योग शिक्षिका ललिता दीक्षित उपस्थित होत्या. 
    श्री अंबिका योग कुटीर संस्थेची स्थापना हठयोगी निकम गुरुजींनी सन 1965 साली गिरगाव, मुंबई येथे केली. कुटीरात पू. गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात योग व व्याधी निवारण विषयक संशोधन कक्ष सुरु करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून संस्था कर्परोग विषयी काम करीत आहे. कर्परोग !! मृत्यूचा जवळून अनुभव !! ज्याला होतो त्याला व जवळच्या नातेवाईकांना हादरवून टाकणारा अनुभव. निदान, औषधोपचार, शल्यचिकित्सा, रेडीएशन या सर्वांतून तावून सुलाखून निघाल्यानंतर पुढील आयुष्य एक आव्हान असते. शरीराची कमी झालेली क्षमता, मनाची गेलेली उभारी, नेहमी कानावर येणारे व वाचनात येणारे विचार जाणीव करून देतात की आयुष्य जरी मिळाले तरी ते अजून किती आहे हे निश्चित माहित नाही. कितीही समुपदेशन, देवाची आळवणी, मनाची व शरीराची स्वस्थ्यता देत नाही. मग कोणीतरी सांगतं की योग करून बघा !! यातूनच कॅन्सर सपोर्ट ग्रुपची सुरुवात झाली. श्री अंबिका योग कुटीरचे ठाणे मुख्य शाखा, विलेपार्ले, बोरीवली व वाशी शाखा अशा चार ठिकाणी कॅन्सर सपोर्ट ग्रुप आहेत. एकंदर 160 साधक येथे सातत्याने योगाभ्यास करतात, त्यांचे अनुभव खूपच चांगले व इतरांना फ्रोत्साहित करणारे आहेत. यावेळी ठाणे ग्रुपच्या शिक्षिका ललिता दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरचा आजार बरा झालेल्या दोन महिलांनी आपले अनुभव कथनही केले. कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या सर्व साधकांना एकत्रित आणून त्यांना विशेष मार्गदर्शन व्हावे व अन्य कॅन्सरग्रस्तांना दिलासा मिळावा या उद्देशाने सदर कॅन्सर शिबीर आयोजित केले आहे. हे शिबीर निशुल्क आहे परंतु पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. या शिबिरात बिहार योग स्कूलच्या स्वामी निर्मलानंद सरस्वती यांचे विशेष मार्गदर्शन व योगनिद्रेचा अभ्यास याचा लाभ शिबिरार्थीना मिळेल. या कार्यक्रमाचे थेट फ्रक्षेपण श्री अंबिका योग कुटीराच्या फेसबुक पेजवरून करण्यात येणार आहे. हे थेट फ्रक्षेपण 25 डिसेंबर 2018 रोजी https://fb.com/AmbikaYogaKutir येथे पाहू शकतात अशी माहिती यावेळी देण्यात आली. 
    कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या विशेष  योगवर्गात फ्रवेश घेतल्यानंतर समदुःखी लोक भेटतात व त्यांचा जीवनाकडे बघण्याचा बदललेला दृष्टीकोन जाणवतो. जीवनाला एक नवीन अर्थ फ्राप्त होतो! मनाची सबलता वाढते. हे सर्व योगाच्या शुॆाrक्रिया, श्वसन फ्रकार या मुळे झालेल्या शरीर व मनाच्या परिवर्तनाचे फळ असते. फ्रार्थना, गायत्री- ओंकार, फ्राणाकर्षण, शवासन हा अभ्यास फ्रामुख्याने दिला जातो. 
    अधिक माहिती व नांवनोंदणीसाठी डॉ. फ्रतीभा येळणे (9819161005) अथवा अलका तापडिया (9892525604) यांच्याशी संपर्प साधावा. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad