उल्हासनगर येथे संघटित झालेल्या स्थानिक सिंधी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा निर्धार
ख्रिश्चन मिशनर्यांकडून बळजबरीने होणारे सिंधी समाजाचे धर्मांतर यापुढे चालू देणार नाही !
उल्हासनगर - गरीब, असाहाय्य आणि त्रस्तपणाचा गैरफायदा घेऊन ख्रिश्चन मिशनर्यांरी आतापर्यंत येथील १ लाखाहून अधिक सिंधी आणि अन्य समाजातील हिंदूंचे धर्मांतर केले आहे. प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्याच्या ख्रिश्चन मिशनर्यांच्या या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहे. यापुढे मात्र बळजबरीने होणारे हेे धर्मांतर चालू देणार नाही, असा निर्धार येथील स्थानिक सिंधी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केला आहे. यासाठी २३ डिसेंबर या दिवशी येथील कॅम्प १ मधील गोल मैदानावरील भागवंती नावानी स्टेज येथे सायं. ५ वाजता धर्मातराच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. १९ डिसेंबरला थाहरिया सिंग दरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. थाहरिया सिंह दरबाराचे पूज्य त्रिलोचन सिंहजी आणि जसप्रीत सिंहजी यांच्या आशीर्वादाने ही बैठक पार पडली.
या बैठकीला येथील पी. एस्. आहुजा, शिवसेनेचे नगरसेवक श्री. धनंजय बोडारे, अधिवक्ता मोनीष भाटिया, अधिवक्ता राहुल चतुर्वेदी, सिंधु शर्मा, श्री. अनिल पांडे, श्री. प्रदीप दुर्गिया, श्रीमती कोमल सावंत, सुदर्शन वृत्तवाहिनीचे साजनसिंग लबाना,पू. आसारामबापू संप्रदायाचे श्री. अभिषेक भाई यांसह सिंधी काऊंसिल ऑफ इंडिया, जय झुलेलाल सेवा संघर्ष समिती, प्रबल संघटन, हेल्पिंग हैंड्स फाऊंडेशन, सिंधु सत्याग्रह, विश्व सिंधी सेवा संघ, हिंदु जनजागृती समिती, ब्राह्मण महासभा कल्याण,स्वराज्य हिंदू सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांत काम करणारे समाजसेवक अशा प्रकारे विविध क्षेत्रांत कार्य करणारे राष्ट्र आणि धर्म प्रेमी सहभागी झाले होते. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री.अभय वर्तक हे देखील बैठकीला उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी या बैठकीची प्रस्तावना केली.
धर्मांतराचे संकट परतवून लावण्यासाठी आंदोलनात सहभागी होऊया ! - पी. एस्. आहुजा, प्रमुख, सिंधी समाज
धर्मांतर हे सिंधी समाजावरील मोठे संकट असून ते परतवून लावण्यासाठी संर्वांनी संघटित होऊया. यासाठी होणार्या आंदोलनात सर्वांनी सहभागी होऊया.
आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा ! - श्री. धनंजय बोडारे, नगरसेवक, शिवसेना
धर्मांतराच्या विरोधात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र यायला हवे. आमचा याला पूर्ण पाठिंबा असून आंदोलनाला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित रहावे.
देशातील ७ राज्यांत लागू करण्यात आलेला धर्मारतविरोधी कायदा महाराष्ट्र राज्यातही लागू करण्यात यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच बळजबरीने होणार्या धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर स्वत:चे सभागृह, घर, दुकान, मैदान आदी ख्रिश्चनांच्या प्रार्थनास्थळांसाठी भाड्याने न देणे, बळपूर्वक आणि प्रलोभने दाखवून ख्रिश्चन केलेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात घेणे, यासह धर्मांतराची भयावहता सांगून हिंदूंमध्ये जागरूक निर्माण करणे, यासाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.

No comments