स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त बदलापुरात 25 डिसेंबर रोजी "अटलसंध्या"
बदलापूरः- स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कुळगांव बदलापूर शहरच्या वतीने दि. 25 डिसेंबर रोजी संगीतमय आदरांजली "अटलसंध्या" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. खासदार कपिल पाटील व मा. आमदार किसनराव कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अटलसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन आपल्या कलेचे सादरीकरण करुन प्रेक्षकांचे मने जिंकण्यासाठी सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत, माझ्या नवर्याची बायको या सिरीअसची अभिनेत्री शनया म्हणजेच ईशा केसकर, सुप्रसिध्द गायक शिंदेशाही बाणा उत्कर्ष शिंदे, राहुल सक्सेना, युवा गायक अल्हाद शिंदे, फुलपाखरु मधील वैदेही - रुता दुर्गुळे, तारक मेहता का उल्टा चष्मा चे आत्माराम भिडे - मंदार चांदवडकर, तुला पाहता रे मधील अभिनेत्री मायरा - अभीज्ञा भावे, कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील कमलाकर सातपुते, मीरा मोडक, स्वराज्य रंक्षक संभाजी मधील राणु अक्का - अश्विनी महांगडे पाहुणे कलाकार म्हणुन उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत उदय साटम संकल्पीत कलारंजना प्रस्तुत रंग मराठी ढंग मराठी हे 100 कलाकारांच्या महासंचात महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महासोहळा देखील प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरणार आहे.
25 डिसेंबर रोजी सायं. 6 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असुन बदलापूर (प.) येथील हेन्द्रेपाडा भारत कॉलेज जवळ, मोहन तुलसी विहार समोरील रोडु घोरपडे मैदानात कार्यक्रम होणार असुन जास्तीत जास्त नागरिकांनी व रसिकप्रेक्षकांनी अटलसंध्या कार्यक्रमात उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भाजपा बदलापूर शहराध्यक्ष संभाजी शिंदे व मा. नगरसेवक रमेश सोळसे यांच्याशी संपर्क साधु शकता असे भाजपा पदाधिकारी कृष्णा शिंदे यांनी बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले.
अटलसंध्या कार्यक्रमाच्या पासेससाठी शहराध्यक्ष संभाजी शिंदे, गटनेता राजेंद्र घोरपडे, आयोजन समिती प्रमुख शरद तेली, नगरसेवक संजय भोईर, प्रशांत कुलकर्णी, मा. नगरसेवक रमेश सोळसे व इतर भाजपा पदाधिकार्यांशी संपर्क साधु शकता.

No comments