पाणी बिलातील संधिग्दता एका आठवड्यात दूर करा ; १५ जानेवारीपर्यंत बीएसयुपी सदनिका वाटपाची प्रक्रिया पूर्ण करा ; आढावा बैठकीत महापालिका आयुक्तांचे आदेश
ठाणे- महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या पाणी बिलातील संधिग्दता आणि त्रुटी आठ दिवसांत दूर करण्याचे आदेश देतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नागरिकांनी गेल्यावर्षीची थकबाकी भरल्याचे पुरावे सादर केल्यानंतर चालू वर्षाची थकबाकी भरून घेण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले.
दरम्यान बीएसयुपी अंतर्गत उपलब्ध होणा-या सदनिकांच्या वाटपाची प्रक्रिया १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देवून हे वितरण करताना प्रत्यक्ष राहणा-यांना प्रथम प्राधान्य देण्याच्या तत्वाचा वापर करून करावे अशा सूचना त्यांनी स्थावर मालमत्ता विभागाला दिल्या.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज महापालिका उत्पन्नाच्या वसुलीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मालमत्ता कराच्या देयकांमध्ये गेल्या वर्षीचे बिल भरूनही चालू आर्थिक वर्षाच्या बिलामध्ये थकबाकी दाखविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व तक्रारी प्रभाग समिती स्तरावर तपासून त्या दूर करण्याचे आदेश दिले.
यावेळी श्री. जयस्वाल यांनी पाणी पुरवठा विभागाने प्रभाग समिती स्तरावरील अधिका-यांशी समन्वय साधून अशा पद्धतीच्या तक्रारी तातडीने दूर करण्यात याव्यात असे सांगितले. त्याचप्रमाणे अशा सर्व तक्रारींचा आढावा घेवून त्या बिलांतील संधिग्दता आणि त्रुटी आठ दिवसांत दूर करण्याचे आदेश दिले.दरम्यान बीएसयुपी प्रकल्पातंर्गत उपलब्ध होणा-या सदनिकांच्या वाटपाची प्रक्रिया १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच रेंटल हाऊसिंग इमारतींच्या दुरूस्तीची कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.

No comments