अटलजी विचार रूपाने आपल्यात अमर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'अटल, अचल, अविचल' कार्यक्रमात अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांची काव्यांजली
मुंबई, दि. 25 : 'आदरणीय अटलजी आज शरीर रूपाने आपल्यात नसले तरी विचार रूपाने ते आपल्यात आहेत. त्यांच्या विचारांतून ते आपल्याला सदैव दिशा दाखवत राहतील', असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना व्यक्त केला.
दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात सृजन संपदा संस्थेतर्फे आयोजित 'अटल, अचल, अविचल' कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक खासदार डॉ.विनय सहस्रबुद्धे, त्यांचे सहकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस पुढे म्हणाले, 'अटल, अचल, अविचल' हा कार्यक्रम आपणा सर्वांसाठी प्रेरक असून अटलजींच्या काव्यस्मृतींना उजाळा देणारा आहे. आपणा सर्वांसाठी ते शब्दरुपी अमरच आहेत. त्यांच्याच शब्दांत बोलायचे झाले तर...
‘मैं जी भर जिया, मैं मन से मरूंलौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं?’
मला विश्वास आहे की ते या ओळी खऱ्या करून दाखवतील आणि शब्द व विचार रूपाने वेळोवेळी मार्गदर्शक म्हणून अवतरतील, अशा भावना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी बोलून दाखवल्या. दरम्यान या नाट्यमंदिरातील पु.ल. देशपांडे कला दालनातील 'अटल चित्रांजली' या चित्रपदर्शनीलाही त्यांनी भेट देऊन तेथील कलाकृतींचे कौतुक केले.
No comments