Header Ads

  • ताजा खबरें

    प्लॅटफाॅर्म शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आयुक्तांनी साजरा केला ख्रिसमस: विद्यार्थ्यांशी मारल्या गप्पा

    ठाणे- ख्रिसमस तोंडावर आला असताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या बाजूला ठाणे महानगरपालिकेने निर्माण केलेल्या प्लॅटफाॅर्म शाळेत जावून त्यांच्यासमवेत चाॅकलेट वाटून ख्रिसमस साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या ऋता आव्हाड उपस्थित होत्या.

    ठाणे महानगरपालिकेच्यावतीने मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्लॅटफाॅर्मवर भीक मागणा-या मुलांसाठी प्लॅटफार्म शाळा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या शाळेमध्ये २० विद्यार्थी शिकत आहेत.

    आज दुपारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्लॅटफार्म शाळेला भेट देवून तेथील विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. सांताक्लाॅजसोबत त्या सर्व विद्यार्थ्यांना चाॅकलेट वाटून ख्रिसमस साजरा केला.

    यावेळी महापालिकेचे उपआयुक्त संदीप माळवी, मनीष जोशी, नगर अभियंता राजन खांडपेकर, उपनगर अभियंता कैलाश मुंबईकर, अर्जून अहिरे, शहर व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, शिशणाधिकारी सौ. उर्मिला पारधे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad