Header Ads

  • ताजा खबरें

    भ्रष्ट ट्राफिक पोलिस महादेव हजारे विरोधात कारवाई होऊन त्या ओला ड्रायव्हरला न्याय मिळेल अशी अपेक्षा -पत्रकार महेश कामत

    वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त काळे यांनी दिले चौकशीचे आदेश

    ठाणेः- 100-200 रुपयाच्या लाचेसाठी ओला - उबेर तसेच टुरिस्ट कार चालकांना नाहक त्रास देणार्या भ्रष्ट पोलिस अधिकारी महादेव हजारे विरोधात दै. बदलापूर विकासचे कार्यकारी संपादक महेश कामत यांनी ठाणे वाहतुक शाखेकडे तक्रार नोव्हेंबर महिन्यात दिले होते. त्या तक्रारीचा गांभिर्याने विचार करुन संबंधीत भ्रष्ट ट्राफिक पोलिस विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे दिले आदेश वाहतुक पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दिले आहेत.
    दि. 23 सप्टेंबर 2018 रोजी ठाणे येथे राकेश पंचु पाल नावाच्या एका ओला कार ड्रायव्हर ला ठाणे परिसरात महादेव हजारे या ट्राफिक हवलदाराने थांबविवुन 100 रुपयांची लाच मागितले होते. लाच न दिल्याने त्या ड्रायवरला नाहक त्रास देण्यात आले. विशेष म्हणजे जेव्हा त्याबाबात पीडीत व्यक्तिने तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले तेथे त्याच्या विरोधातच खोटी एफआयआर दाखल करण्यात आले.
    संपुर्ण प्रकार सप्टेंबर महिन्याला घडले. ड्रायव्हरला थांबवुन गाडीचे कागदपत्रांची मागणी किंवा लायसन्सची मागणी करणे नियमाप्रमाणे योग्यच आहे परंतु हजारे नावाच्या या भ्रष्ट ट्राफिक पोलिसालायांचा इंटस्ट गाडीच्या कागदपत्र पाहण्यात नसुन 100-200 रुपयांची तोडपाणी करण्यात होती. ओला कार ड्रायव्हरकडे सर्व कागदपत्र असतांना त्याला पैश्याची मागणी करत 100 रुपये दिल्यास सोडुन दिले जाईल असे म्हटले. चुक नसतांना पैसे कशाला द्यायचे म्हणुन ओला ड्रायव्हरने विचारणा केली असता तसेच सदर भ्रष्ट पोलिस अधिकारी लाच मागत असल्याने पुरावा म्हणुन पाल ने मोबाईलवर शुटिंग करत असतांना हजारे ने कायदा हातात घेत ड्रायव्हरच्या हातातुन मोबाईल हिसकावणे, ड्रायव्हरला मारहाण करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. अश्याप्रकारे स्वतः पोलिस असतांना सुद्धा कायदा हातात घेतला आहे. शुट केलेल्या व्हिडीओ मध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे. पिडीत कार चालकाने तो पुरावा त्याच्या पत्निला पाठविले व पोलिसात "त्या" लाचखाऊ पोलिस कर्मचारी विरोधात तक्रार करण्यासाठी गेले असता तेथे पोलिसांनी उलट त्या पिडी विरोधातच खोटी तक्रार दाखल करुन पोलिसाला मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा टाकणे असे खोटी एफआयआर तयार करुन पिडीतेला तुरुंगात पाठविले. पिडीतेच्या पत्निने अनेकदा कोर्टाचे चक्कर मारल्यानंतर तब्बल 1 महिन्यानंतर जामिनावर पालची सुटका करण्यात आले. घडलेला सर्व प्रकार पिडीत व त्यच्या पत्निने बदलापुर विकास वृत्तपत्राला सांगितले असता संबंधीत भ्रष्ट पोलिस कर्मचारी विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त व ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्याकडे निर्भिड पत्रकार महेश कामत यांनी तक्रार अर्ज दाखल केले होते.


    उपायुक्तांच्या आदेशावरुन घटनेची चौकशी व स्टेटमेंट नोंदविण्याचे काम सुरु झाले असुन महादेव हजारे या भ्रष्ट कर्मचार्यामुळे पोलिस खात्याचे नाव बदनाम झाले असुन लवकरच लवकर या केसची चौकशी करुन त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा पत्रकार कामत यांनी वर्तवली आहे. चौकशीसाठी उल्हासनगर वाहतुक विभागाकडे कार्यालयीन आदेश देण्याच आला असुन तसे पत्र पत्रकार कामत यांनी वाहतुक पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी पाठविले आहे.

    Journalist Mahesh Kamath
    "पिडीत एक ओला ड्रायव्हर जरी असला तरी मी त्याला मदत करण्यास तक्रारदार म्हणुन मी उभा राहिले कारण आज भ्रष्ट पोलिसांना भरपूर माज आला आहे. जोवर अश्या काही भ्रष्ट पोलिसांवर कडक कारवाई होत नाही तोवर 100-200 च्या लाचेसाठी सामान्य नागरिकांना तसेच गोर गरिबांना छळणार्या भ्रष्ट पोलिसांची पैसे खाण्याची सवय जाणार नाही" असे पत्रकार कामत यांनी बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले.  

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad