घरकुलांच्या बांधकामाची पाहणी व कामगारांना सुरक्षाकिटचे वाटप
कामगारांच्या सुरक्षेचा विचार करुन भाजपाचे अनिल घरत यांचा उपक्रम
मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- मुरबाड तालुक्यातील चाफे ग्रामपंचायत मौजे शिरवाडी याठिकाणी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मंजुर घरकुलांचे बांधकाम पिपल ट्री वेंचर्स प्रा. लि. च्या देखरेखीखाली होत असुन त्या कामाची पाहणी भाजपाचे अनिल घरत यांनी केली.
त्याचसोबत कामगारांच्या सुरक्षेचा विचार करुन त्यांनी बांधकामाचे काम करणार्या गवंडी व कामगारांना सुरक्षाकिटचे वाटप केले.
पक्के व दर्जेदार घरांचे बांधकाम होत असुन नववर्षात लाभार्थी आपल्या हक्काच्या पक्क्या घरात वास्तव्यास जाण्यासाठी अनिल घरत यांनी शुभेच्छा दिल्या.
No comments