Header Ads

  • ताजा खबरें

    आपणही जर सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करत असाल तर खबरदार...


    डोंबिवली (बदलापूर विकास मिडिया)- सध्याच्या काळात तरुण मंडळी वेळेपेक्षा लवकर वयात येत (मेच्योर होत) असल्याने "गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड" म्हणजेच काय तर जेथे तेथे आपल्याला "रोमियो जुलेट" सारखे "कपल" अनेकठिकाणी दिसतात. परंतु अनेकदा काही अतिउत्साही कपल्सच्या चुकीच्या वागण्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करण्यामुळे त्याठिकाणी उपस्थित लोकांना त्याचा त्रास होतो. साहजीकच आहे प्रायव्हेसी म्हणजे काय हे विसरलेल्या आजच्या तरुण पिढीला सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करतांना त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर "प्रेम करतांना" त्यांना आपल्या अवती भोवती असलेल्या लोकांचा विसर पडतो.
    बस स्टॉप, मॉल, चित्रपट गृह, रेल्वे स्टेशन अश्या अनेक ठिकाणी आजकाल कपल्स कडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे - समोरच्याच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य होतांना अनेकदा दिसते. परंतु काही मिनिटांपुर्वीच फेसबुक या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला पाहिल्यावर रोमियो-जुलेट यापुढे सार्वजनिक ठिकाणी नक्कीच या गोष्टींचा भान ठेवतील. 


    कार्तिक रणशेवरे या फेसबुक युझर ने एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केले असता त्या व्हिडीओ मध्ये कॉलेजचे तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी समोरच्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे चाळे करतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे जेव्हा व्हिडीओ शुट करणार्याने ते रोखले व सार्वजनिक ठिकाणी तसे करु नये असा सल्ला दिला तेव्हा आम्ही कीसींग वगेरे तर करत नाही ना असा उलट प्रश्न त्या तरुणाने केले.
    भारतीय दंड संहिता कलमांमध्ये तरतुद आहे कि सार्वजनिक ठिकाणी चुकीचे कृत्य, अश्लील कृत्य, अवती भोवती असलेल्या नागरिकांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्यास गु्न्हा दाखल होऊन शिक्षा किंवा दंड असे प्रावधान असुन तरुण - तरुणींनी सार्वजनिक ठिकाणी असतांना थोडं भानावर राहिलेले बरे...
    सदर व्हिडीओ शेकडो लोकांनी आतापर्यंत फेसबुकवर शेअऱ केले असुन व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - https://www.facebook.com/kartik.ranshevare/videos/1633518966747661/

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad