Header Ads

  • ताजा खबरें

    आश्रम शाळेतील आत्महत्या सारख्या दुदैवी घटना रोखण्यासाठी समर्पण चँरिटेबल ट्रस्ट जनजागृती करणार.

      शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अघई आश्रमशाळातील इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या कु.दिपाली रावजी वांगड वय वर्ष 14 हिने आश्रमशाळे मधिल वस्तीग्रुहात गळफास लावुन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.दिपाली वांगड या विद्यार्थीनीने केलेली आत्महत्या ही सुज्ञ समाजाला एकप्रकारचा धडा आहे असे मत समर्पण चँरिटेबल ट्रस्टचे सचिव श्री.मनोज कोरडे यांनी व्यक्त करून या पुढे अशा प्रकारच्या दुदैवी घटना घडुनयेत या करीता समर्पण चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     अघई आश्रमशाळेतील दिपाली वांगड या विद्यार्थीनीच्या आत्महत्या प्रकरणात आज समर्पण चँरिटेबल ट्रस्टचे सचिव श्री.मनोज कोरडे व सामाजिक कार्यकर्ते MSW श्री.महेंद्र पंडागळे यांनी अघई आश्रमशाळेला भेट देऊन तेथील प्रभारी मुख्याध्यापक श्री.पवार  आणि शिक्षण श्री.महाजन सर यांच्या कडून घडलेल्या प्रकाराची अधिक माहिती जाणून घेतली.

    वाचा - आपणही जर सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करत असाल तर खबरदार...

    ट्रस्टच्या वतीने शहापूर विधानसभेचे आमदार मा.पाडुरंगजी बरोरा साहेबांची शहापूर विश्राम ग्रुहात भेट घेऊन या विषयावर चर्चा करण्यात आली तसेच वरीष्ठ पोलीस निरिक्षक ,शहापूर पोलीस स्टेशन यांना या प्रकरणात निपक्षपणे तपास करून पिडीत कुटुंबातील व्यक्तींना न्याय देण्यासाठीचे निवेदनही देण्यात येऊन एकात्मिक आदिवासी विकास विभाग शहापूर येथील प्रकल्प कार्यालयाला भेट देण्यात आली.
    समर्पण चँरिटेबल ट्रस्ट शहापूर तालुक्यातील आदिवासी विभागात कार्यरत असून आदिवासी बांधवांच्या विविध विषयांवर काम करत आहे.ट्रस्ट ने गेल्या वेळी तानसा अभयारण्य परीसरातील आदिवासी पाड्यांवर कार्यक्रम करता वेळेस अघई आश्रमशाळेला भेट दिली होती त्यावेळेस तेथील मुख्याध्यापक ,शिक्षक व कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता.
    अघई आश्रमशाळा ही आय एस ओ नामाकंन प्राप्त आश्रमशाळा असुन शहापूर तालुक्यातील एक आदर्श आश्रमशाळा असताना कु.दिपाली वांगड या विद्यार्थीनींचे आत्महत्या करण्या मागचे नेमके कारण काय हा महत्त्वाचा प्रश्न असुन अशा प्रकारच्या आत्महत्या सारख्या दुदैवी घटना रोखण्यासाठी ट्रस्ट तर्फे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यां सोबत संवाद साधत जनजागृती करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे सचिव श्री.मनोज कोरडे यांनी सांगितले.अधिक माहितीसाठी मनोज कोरडे, सचिव - समर्पण चँरिटेबल ट्रस्ट यांच्याशी मो.9763158750 या क्रमांकावर संपर्क साधु शकता.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad