
उल्हासनगर (बदलापुर विकास मिडिया)- बदलापुर बैरेज रोड येथील आशिष कॅटर्सचे संजय बाघेल व टीमने वर्ष 2018 ला निरोप सामाजिक उपक्रम राबवुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिले. आपल्या मित्र व कॅटर्स टिमसोबत उल्हासनगर येथील गौ शाला मंदिरात अन्नदानाचे कार्यक्रम राबवत शेकडो नागरिकांना जेवण देऊन त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सध्याच्या काळात तरुण मंडळी जेथे 31 साठी नाईट क्लब, डीसे, फटाक्यांची आतिषबाजी मध्ये रमण्याचा विचार करतात तेथे संजय बाघेल या तरुणाने अन्नदान करुन नववर्षाचे अश्याही प्रकारे स्वागत करता येईल हे दाखवुन दिले.
No comments