रेल्वेत भरती, विविध पदांकरिता निघाली भर्ती, 35 हजार पगार
मुंबई (बदलापुर विकास मिडिया)- रेल्वे भर्ती बोर्डात नुकताच ज्युनिअर अभियंता पदांकरिता भर्ती असल्याने लवकरच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे समजते. रेल्वे तर्फे ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांकरिता अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा भर्ती होणार असुन आपल्याला जर नोकरीसाठी अर्ज करायचे असल्यास रेल्वेच्या अधिकृत्त वेबसाईटवर जाउन अप्लाई करता येईल. नुकताच सुरु करण्यात आलेल्या रेल्वे भर्तीत एकुण 14033 पदांकरिता अर्ज मागिवण्यात आले होते, तसेच प्रत्येक पोस्टच्या आधारे उमेदवारांची संख्या निश्चित केले आहे. एकुण पद - ज्युनियर अभियंता 13034, ज्युनियर अभियंता (आई.टी.) 49, अधिक्षक 456, डिपोट मटेरियल व केमिकल अॅण्ड मेटलर्जीकल असिस्टेंट पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. अधिसुचनेनुसार या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2019 असुन यासाठी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड संगणक लिखित परीक्षा (सीबीटी) घेऊनच केली जाणार असुन त्याच उमेदवारांना नियुक्त देशात कोणत्याही ठिकाणी होऊ शकते.
ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांना 35400 रुपयांचा पे-स्केल दिला जाईल. या पदांसाठी बीटेक, डिप्लोमा आणि बीएससी झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी जनरल ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 500 व एस.सी. एस टी पीएच वर्गातील उमेदवारांना 250 रुपये भरावे लागेल. रेल्वेत नोकरीला लावतो असे सांगुन पैसे उकळणार्या एजंटच्या जाळ्यात फसु नये स्वतः रेल्वेच्या अधिकृत्त वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा असे बदलापूर विकासने आवाहन केले आहे.

No comments