Header Ads

  • ताजा खबरें

    थर्टीफस्ट व नववर्षात कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लागु नये म्हणुन पोलीस सज्ज

    प्रसिध्दीपत्रकाद्वारे अपर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी नागरिकांना केले आवाहन
    कल्याण (बदलापुर विकास मिडिया)- 31 डिसेंबर 2018 रोजी जुन्या वर्षाच्या पुर्वसंध्येला व नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण अंतर्गत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर मधील पोलीस ठाणेचे हद्दीत खालील नमुद प्रमाणे बंदोसस्ताची व कार्यप्रणालीची आखणी करण्यात आी असुन त्यानुसार बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.

    - दि. 30 डिसेंबर रोजी रात्री 9 पासुन ते पहाटे 4 वाजेपर्यंत तसेच दि. 31 डिसेंबर रोजी रात्री 8 ते पहाटे 4 पर्यंत सर्व प्रवेश मार् व बाहेर जाण्याच्या मार्गावर नाकाबंदी तसेच दारु पिऊन गाडी चालवणार्यांची तपासणी करण्यात येणार.

    - अवैध गावठी दारु विक्रेते, वाहतुक करणे, हातभट्ट्या लावणारे, अंमली पदार्थ विक्रेते यांचे शोध घेवुन कारवाई करणार.

    -प्रत्येक पोलीस ठाण्यात 1 अधिकारी व 5 कर्मचारी यांचे स्वतंत्र पथक नेमून ऑक्रेस्ट्रा बार, लेडीज सर्व्हिस बार, हॉटेल, लॉजेस्, ढाबे चेक करुन कारवाई करण्यात येणार.

    - महिला, मुलीची छेडछाड होवु नये तसेच मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग होवु नये याकरिता स्वतंत्र पथक नेमुन कारवाई करण्यात येणार.

    - रेकॉर्ड वरील क्रियाशील गुंड, गुन्हेगार, माहीतगार गुन्हेगार तसेच मागील 3 वर्षात ज्यांचे विरुद्ध नवर्ष स्वागताच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत त्यांचे विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार.

    - पोलीस उप आयुक्त यांचे अधिपत्याखाली अॅन्ट्री रॉबरी सेल तसेच विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे अधिपत्याखाली अॅन्टी मोबाईल स्कॉ़ड मधील अधिकारी व कमर्चारी यांना चैन स्नॅचिंग व मोबाईल स्नॅचिंग होणार्या परिसरात गस्त ठेवण्यात येणार.

    - पोलीस ठाणे हद्दीतील गर्दीची ठिकाणे, महत्वाचे मॉल, सिनेमागृहे, हॉटेल या ठिकाणी सशस्त्र पोलीस व गस्ती पथके नेमण्यात येणार आहे.

    - ध्वनि प्रदुषण व फटाके संदर्भात मा. उच्च न्यायलय - सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचना, निर्देश यांचे उल्लंघन करणार्या विरुद्ध कारवाई करणार.

    - विनापरवाना कार्यक्रमाचे आयोजन करणार्या विरुद्ध कारवाई करण्यात केली जाणार आहे.

    - नववर्षासाठई परमीट रुम, शाकाहारी हॉटेल, रेस्टॉरंट, आर्केस्ट्रा बार हॉटेल आणि रेस्टॉरंट पहाटे 5 वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास या आस्थानाना परवाना प्राधिकार्यांच्या पुवर् परवानगीने केवळ नववर्षासाठी दिले असल्याने नियमांच्या अधिन राहुन सुरु ठेवणे आहे तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीत आयोजकाविरोधात कारवाई करण्यात येईल.

    अश्या प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवु नये म्हणुन पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण चे अपर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची व कार्यप्रणालीची आखणी करण्यात आली आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad