जयपाल पाटील यांना समाजसेवक पुरस्कार
अलिबाग - संपूर्ण महाराष्ट्रात २४ हजार नागरीकांना आपत्ती व सुरक्षेचे धडे पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांना प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तथा राजयोग एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फाउंडेशनच्या समाजसेवा प्रभागातर्फे विंगचे राष्ट्रीय संयोजक प्रेमभाईंच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.
आयी ये हम एक आदर्श समाज निर्माण करे या विषयावर वासुदेव बळवंत फडके सभागृहात राष्ट्रीय अध्यक्षा संतोष दीदी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक तारा दीदी यांनी केले. तर पनवेलच्या महापौर डॉ.कविता चौथमल, रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. गुणे, भाई अमिरचंद, संतोष दीदी, अवतार भाई, लायन निशा शर्मा व आमदार बाळाराम पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, समाजसेवक जे.एम.म्हात्रे यांनी यावेळी आपले विचार मांडले.
रायगडातील २५ समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. दिलेल्या सन्मानपत्रात म्हटले आहे की, समाजाला सुखी बनविण्यासाठी आपण अनेक कार्य केलीत आणि आताही करीत आहात. आपली समाजसेवा अनमोल प्रेरणादायी आहे. समाजसेवक आपण आग्रेसर आहात. त्यामुळे आपणांस सन्मानित करण्यात येत आहे. यावेळी अध्यक्षीय भाषणात तारा दीदी म्हणाल्या की, प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्वविद्यालय गेल्या ८० वर्षापासून मानवांच्या सेवेत आहेत. जगातिल १३० देशात ४५०० केंद्रांत याचे कार्य चालते. समाजाचा विचार सकारात्मक झाला पाहिजे आणि समाजात आपले नियमित कार्य करुन समाजाप्रती सेवा देणाऱ्यांचा सन्मान आज आम्ही करीत असून त्यांची प्रेरणा इतरांनी घ्यावी, असा उद्देश आहे. आणि त्यामधूनच आदर्श समाज निर्माण करण्याचे कार्य तुम्ही आम्ही करावयाचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वंदना दीदी हिने केले. तर आभार डॉ. शुभदा निल यांनी मानले. रायगडातून मोठ्या संख्येने पत्रकार, समाजसेवक, प्रजापिता ब्रम्हकुमारीचे बंधु-भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

No comments