Header Ads

  • ताजा खबरें

    बालप्रेक्षकांच्या उपस्थितीत बालनाटय़ महोत्सवाचे उद्घाटन

    ठाणे- ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या बालनाटय़महोत्सवाचे उद्घाटन आज (24 डिसेंबर) गडकरी रंगायतन येथे विद्यार्थ्याच्या उपस्थितीत महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांमधील कलागुणांना वाव देता यावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते, यात जास्तीत जास्त संख्येने संस्थांनी सहभागी व्हावे व महोत्सव यशस्वी करावा असे सांगत महापौर मिनाक्षी शिंदे यांनी सर्व बालकलाकरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे तसेच गंधार संस्थेचे बाळकृष्ण ओडेकर व सुनील जोशी आदी उपस्थित होते.
          ठाणे शहरातील बालकलाकरांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी बालनाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी 24 व 25 डिसेंबर अशा दोन दिवशी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात एकूण 10 बालनाटये सादर होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दिग्दर्शक शंकर बापु धुलगडे, सिध्देश बागवे दिग्दर्शित ’लहान मुलांची बाप गोष्ट’, करिश्मा वाघ दिग्दर्शित ’मोगलीच्या जंगलात मोटू पतलु’, संदिप गचांडे दिग्दर्शित ’चॉकलेटचे झाड, चेटकिणीची धाड’,  राजेश राणे दिग्दर्शित ’संगोपन’, यतिन माझिरे दिग्दर्शित ’आकार’, वैभव नवसकर दिग्दर्शित ’थेंबाचे टपाल’ या बालनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले.
          महोत्सवाच्या दुस-या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर, 2018 रोजी वैभव ढोमसे दिग्दर्शित ’सोनेरी स्वप्न’, माधवी राणे दिग्दर्शित ’आपटे कोचिंग क्लासेस’, विनिता राज दिग्दर्शित ’एक था टायगर’, मंदार टिल्लू दिग्दर्शित ’बँक ऑफ बालपण’ या बालनाटय़ाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
          या महोत्सवातील बालकलाकरांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठय़ा संख्येने विद्यार्थी व ठाणेकर नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad