Header Ads

  • ताजा खबरें

    पुन्हा एकदा उल्हासनगरात जीन्स कानखाने सुरु होणार, व्यापार्यांमध्ये आनंदाचे वातावरण!

    टीओके चे ओमी कालानी व महापौर सौ. पंचम कालानी यांच्या प्रयत्नांना यश 

    उल्हासनगर (बदलापुर विकास मिडिया)- महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाने काही महिन्यांपुर्वी उल्हासनगर मधील सर्व जीन्स वॉशींग कारखान्यांवर धडक कारवाई करुन त्या सर्वांचे व्यवसाय बंद पाडण्यात आले. ज्या उल्हासनगर शहराच्या हजारो कामगार उल्हासनगरातील जीन्स कारखान्यात काम करत होते अचानक कंपनी बंद पडल्याने उपाशी पडण्याची वेळ त्या कामगारांवर आली होती. तसेच व्यापार्यांना देखील आर्थिक नुकसान सोवावे लागले होते. अनेकांनी तर उल्हासनगर सोडुन बदलापुर, वांगणी, कर्जत व इतर ठिकाणी आपले कारखाने स्थलांतरीत करुन आपला व्यवसाय नव्याने सुरु करण्याचा प्रयत्न ही केला. व्यापार तसेच जीन्स कारखाने हे उल्हासनगर शहराचा मणका असल्याने त्यालाच धक्का लागल्याने उल्हासनगर शहराच्या व्यापार्यांमध्ये नाराजी पसरली होती. ज्यामुळे सर्व व्यापार्यांनी आपले शिष्ट मंडळ उल्हासनगर टीओकेचे संस्थापक ओमी कालानी तसेच उल्हासनगर महापालिकेच्या महापौर सौ. पंचम कालानी यांना आपले सर्व परिस्थिती दाखवुन तुम्हीच आता काही तरी करा आणि आम्हाला न्याय मिळवुन द्या असे सागडे व्यापार्यांनी कालानी कुटुंबियांकडे घातले होते.


    वाचा - रेल्वेत भरती, विविध पदांकरिता निघाली भर्ती, 35 हजार पगार


    व्यापार्यांची ही समस्या सोडविण्यासाठी तसेच बेरोजगार झालेले व उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांचा विचार करुन आमदार सौ. ज्योति कालानी यांच्या मार्गदर्शनाखाली ओमी कालानी व महापौ्र सौ. पंचम कालानी यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ तसेच मंत्रालयात विषयाचा पाठपुरावा केला. शेवटी कालानी कुटुंबियांच्या प्रयत्नाने यश आले असुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाने इंडस्ट्रीचे सांडपाणी ट्रीटमेंट साठी इटीपी देण्याचे मान्य केल्याने पुन्हा एकदा उल्हासनगर शहरात जीन्स वॉशिंगचे कारखाने सुरु होणार असुन यामुळे हजारों बेरोजगारांना पुन्हा एकदा रोजगार मिळणार आहे. 
    व्यापार्यांचा तसेच गोर गरिब कामगार वर्गाचा विचार करुन न्याय मिळवुन दिल्याबद्दल आमदार सौ. ज्योती कालानी, टीओकेचे ओमी कालानी व महापौर सौ. पंचम कालानी यांचे व्यापार्यांनी व कामगारांनी मनापासुन आभार मानले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad