भूमिपुत्रांना उध्वस्त करणारे शाही धरण नकोच, आमदार किसन कथोरे चा शाही धरणाला तीव्र विरोध
टिटवाळा (बदलापुर विकास मिडिया)- ठाणे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी मुरबाड व शहापूर तालुक्यातील शाही नदीवर धरण बांधणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत, या धारणास मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी प्रखर विरोध करणार आहेत, हजारो स्थानिक शेतकरी भूमिपुत्र कुटब या धरणामुळे उध्वस्त होणार आहेत, म्हणून माझा विरोध आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली, ग्रामीण भागात फक्त धरणे बांधायची येथील स्थानिक भूमिपुत्रांना विस्थापित करायचे आणि शहरी नागरिकांना पाणी द्यायचे या शहरी हिताच्या धोरणामुळे ग्रामीण भागावर मोठा अन्याय होतो, पारंपरिक शेतीवेवसाय आणि ,वडिलोपार्जित शेतजमीन,राहाते घरदार सोडून ग्रामस्था विस्थापित व्हावे लागते, त्याच्या त्यागाची किंमत काय तर , पैसे रूपाने मिळणारा तुटपुंजा मोबदला , यामुळे स्थानिक भूमिपुत्रांन देशोधडीला लागतो आहे, त्यामुळेच माझा शाही धरणाच्या उभारणीस प्रखर विरोध असणार आसल्याची माहिती आ, किसन कथोरे यानी दिली, ,यामुळे खळबळ माजली आहे, महापालिका प्रशासनात स्वतंत्र पाणी पुरवठा विभाग असतो, या विभागाने भविष्याचा विचार करून आपल्या शहराची वाढती लोकसंख्या त्यांना उपलब्ध पाणी आणि आवश्यक पाणी साठा याचे नियोजन करणे आवश्यक आहे, मात्र याबाबत कोणतीही महापालिका नियोजन करत नाही, याच महापालिका परिसरात सध्या पाण्याची होणारी मोठ्याप्रमाणात गळती , तसेच चोरी आणि वाढता अनावश्यक पाणी वापर यावर पालिका प्रशासनाने नियंत्रण नाही , फक्त पाणी हवे यासाठी मोठी धरणे बांधण्याकडे पालिका प्रशासन लक्ष देते,त्यामुळे किती सामाजिक हानी होते, हाजोरो कुटुंबातील सदस्य विस्थापित होतात, शाही धरणामुळे 14 हुन अधिक गावाचे स्थलांतर करावे लागणार आहे, या गावातील 1 हजार 860 कुटूंबाना आपले संसार मोडावे लागणार आहेत, त्यामुळेच माझा विरोध आहे.वाचा - जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी अर्चना देशपांडे यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप
- परिचय केंद्राद्वारे राजधानीत महाराष्ट्राची प्रतिमा उंचविण्याचे उत्तम कार्य -खासदार राजू शेट्टी
- महाराष्ट्रातील संरक्षण मंत्रालयाच्या जागेवरील विकास कामांविषयी महत्वपूर्ण बैठक
यापूर्वी च्या, भातसा, तानसा वैतरणा या धरणग्रस्ता चे पुनवर्सनाचा प्रश्न आद्यपि धूळखात आहे, येथील विस्थापित कुटुंब आज ही यातना भोगत आहेत,त्यात आता नवीन शाही धरणाची भर नको,
महापालिका प्रशासनास धरणे बांधयची असतील तर छोटी , छोटी , धरणे शहराच्या नजीक च्या ग्रामीण भागात बांधावीत , शाही धरण बांधण्यासाठी चा प्रयत्न करून भूमिपुत्रांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयन्त केल्यास मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे, असे ही किसन कथोरे यांनी सांगितले,
No comments