Header Ads

  • ताजा खबरें

    तणावमुक्तीसाठी विशेष सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन ; ठाणे महापालिका व इंटरनॅशनल युथ फेलोशीपचा संयुक्त उपक्रम

    ठाणे - रोजच्या तणावमुक्तीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा आणि तणावग्रस्त आयुष्याकडून निरोगी आयुष्याकडे वाटचाल करता यावी यासाठी ठाणे महानगरपालिका आणि इंटरनॅशनल युथ फेलोशीप, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने `ग्रँड कॅन्टाटा - ए म्युझिकल ड्रामा` या विशेष सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
          बुधवार दिनांक 26 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती दिपक वेतकर, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा सौ.रागिणी बैरीशेट्टी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
          या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन तणावग्रस्त जीवनातून निरोगी आयुष्याकडे कशी वाटचाल करून शकतो हे संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामुल्य असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad