Header Ads

  • ताजा खबरें

    दादागिरी करणार्या रिक्षाचालकांपासून स्वतः रिक्षा व्यवसायिकच हैराण, मग नागरिकांचे काय हाल होत असेल...

    बदलापूरः- नुकताच सोशल मिडिया फेसबुकवर बदलापूरातील रिक्षा चालवुन आपला उदरर्निवाह करणारे उमेश भालेकर यांनी त्यांच्यावर मुजोर रिक्षाचालक कशाप्रकारे दादागिरी करत त्यांचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केला त्याबाबत त्यांनी फेसबुक या सोशल मिडिया मध्ये त्यांच्या वॉलवर पोस्ट करुन सविस्तर माहिती दिली.
    उमेश भालेकर म्हणतात कि, ते जेव्हा आपली रिक्षा डीमार्ट जवळील रस्त्यावरुन येत असतांना त्याठिकाणी एक महिला प्रवाशीने  रिक्षाची वाट पाहत उभे होत्या त्यावेळी  त्याठिकाणी रिक्षास्टैंडवर एकही रिक्षा उपलब्ध नसल्याने प्रवाशाने हात केल्याने सदर रिक्षाचालकाने रिक्षा थांबवुन भाडे घेत असतांना त्याचवेळी दोन-तीन गुंडप्रवृत्तीचे मुजोर रिक्षाचालक त्याठिकाणी आले व विनाकारण हुजत करत होते. ते मुजोर रिक्षाचालक तिथवर न थांबता उमेश भालेकर यांच्या नकळत त्यांच्या रिक्षाचे टायर देखील पंचर केले. त्या अज्ञात रिक्षाचालकांना ते ओळखत जरी नसले तरी त्या मधल्या एकाने कपाळावर टिळा लावलेला होता असे सांगितले. अशाप्रकारे प्रामाणिकपणे रिक्षाव्यवसाय करणार्या रिक्षा चालकांना देखील आता नाहक त्रास मुजोर रिक्षाचालकांकडुन दिले जात आहे.
    त्यांनी पोस्ट केलेली घटना वाचल्यानंतर बदलापुरातील नागरिक म्हणतात कि,  स्वतः  रिक्षा चालक व व्यवसायिकच जर मुजोर रिक्षाचालकांमुळे हैराण आहे तर सामान्य नागरिकांची व प्रवाशांची या मुजोर रिक्षाचालकांच्या वागणुकीमुळे काय हाल होत असेल याचा सर्वांनी विचार करावा.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad