Header Ads

  • ताजा खबरें

    ठाण्यात ‘’महापौर चषक राज्यस्तरिय निमंत्रित मल्लखांब’’ स्पर्धेचे आयोजन

    ठाणे (28 ): ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा मल्लखांब संघटना यांचे संयुक्त विद्यमाने ठाणे महापौर चषक राज्यस्तरिय निमंत्रित मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार 29 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ठाण्यातील महात्मा फुले नगर येथील भारतरत्न सचिन तेंडूलकर मिनी संकुल  येथे या स्पर्धा होणार असून हे सामने पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
           यावेळी खासदार सर्वश्री राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, कुमार केतकर, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी,स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश मस्के,विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती दिपक वेतकर, लोकमान्यनगर सावरकरनगर प्रभाग समिती अध्यक्षा कांचन चिंदरकर आदी उपस्थित राहणार आहेत.
          दिनांक २९ डिसेंबर २०१८ रोजी ठाणे महापौर चषक जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा होणार असून यामध्ये मुले १२ वर्षाखालील , १४ वर्षाखालील,  १८ वर्षाखालील व पुरुष १८ वर्षावरील तर मुली १२ वर्षाखालील , १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील व महिला १६ वर्षावरील अशा एकूण ८ गटात स्पर्धा होणार आहे.तसेच दिनांक 30 डिसेंबर २०१८ रोजी खुल्या गटातील महापौर चषक निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा  होणार असून स्पर्धेसाठी एकूण दीड लाखाची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी हे सामने पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad