शहापूर बस-स्थानक बनला आहे कचर्याचे डंपीग ग्राउड तर खाजगी वाहणांचे पार्किंग झोन?
शहापुर (बदलापूर विकास मिडीया)- महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाचे शहापूर आगाराचे बस स्थानक समस्यांचे केद्रं बनले आहे.ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुका हा अदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो,त्यामध्येच काही भाग अती दुर्गम असल्याने ग्रामीण भागातील एस.टी हेच दळणवळणाचे मुख्य साधन आहे दररोज ग्रामीण भागातील हजारो प्रवाशी, विद्यार्थी,व महीलावर्ग एस.टीने प्रवास करत असतात. परंतु शहापूर आगारामध्ये मोठ्या प्रमाणात घानीचे साम्राज्य पसरले असुन त्यावर कुञे,डुकरे फिरताना दिसत आहेत त्यामुळे दुर्गधीयुक्त वास येत असल्याने प्रवांशाना नाकावर रुमाल धरावा लागतो,तसेच या आगारामध्येच खाजगी गाड्यांची अनाधिकृत पार्किंग मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रवाशांना एस.टी पकडताना तारेवरची कसरत करावी लागते,खाजगी गाड्याचे वाहनचालक कश्याही पद्धतीने गाड्या चालवत असल्याने अनेक अपघात देखील आगारामध्ये होत आहेत.
गेटवर कुठल्याही प्रकारचा सुरश्रा रश्रक नसतो, मुख्य म्हणजे या विषयाकडे आगारप्रमुख व इतर अधिकार्याचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.आगारप्रमुख मोरे मॅडम यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. शहापूर आगार हा समस्यांचा आगार बनल्याचे प्रवासी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान बस स्थानक लवकरच अद्यावत होणार असुन दोन दिवसांनी त्याचा नारळ ही वाढविला जाणार आहे त्यासाठी शासकीय निधीतून अंदाजे तीन कोटी ६८ हजार रुपये खर्च केला जाणार असल्याचे बोलले जाते.आगारातील भेडसावत असणाऱ्या समस्या कधी संपतील? व प्रवाशांना चकाचक बस स्थानक कधी भेटेल याकडे प्रवाशांचे लश्र लागले आहे.

No comments