Header Ads

  • ताजा खबरें

    मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांच्याकडून कोकण विभागाचा आढावा ; अंतिम मतदार यादी अद्ययावत व अचूक असण्याची दक्षता घ्या

    ठाणे : मतदार याद्यांबाबत मतदारांच्या हरकती व दावे निकाली काढताना मतदारांचा तपशिल उदा. नाववयपत्तालिंग इ. व छायाचित्र ओळखपत्र यामध्ये कोणत्याही त्रुटी व विसंगती निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सुचना मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी दिल्या. अंतिम मतदार यादी जास्तीत जास्त अद्ययावत व शुध्द स्वरुपात आणि अचूक तयार होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. मतदार याद्यांच्या सखोल स्वरुपात संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रमाचा कोकण विभागाचा आढावा त्यांनी नुकताच् नियोजन भवन येथील सभागृहात घेतला, त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पालघर जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे व इतर जिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.  
     यावेळी अश्विनी कुमार यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समवेत मतदान केंद्र सहाय्यक यांच्या बैठका घेण्याबाबत सुचना दिल्या. मतदार यादीतील दुय्यम ,अनेकविधसमान नोंदीमयत मतदारकायमस्वरुपी स्थलांतरित झालेले मतदारअपात्र व चुकीच्या नोंदी असलेल्या मतदारांची व मतदार यादीतील संगणकीयतांत्रिक व तार्किक आधारावर चुकीच्या असलेल्या नोंदी व्यवस्थित वगळण्याबाबत काळजी घेण्यासही त्यांनी सांगितले. तसेच महत्वाच्या व्यक्तींच्या व दिव्यांग व्यक्तींच्या नावाची पडताळणी करुन ती चिन्हांकित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad