सहयोग महाविद्यालयाचा रोहित महाजन तर ज्ञानोदय महाविद्यालयाची कोमल सिंग “ठाणे युथ आयकॉन”
ठाणे(बदलापुर विकास मिडिया)- ठाणे महानगरपालिका व ठाणे स्मार्ट सिटी लि.यांच्यावतीने ठाणे शहरातील महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी आयोजित “ठाणे युथ आयकॉन”स्पर्धेत सहयोग व्यवस्थापन महाविद्यालयचा रोहित महाजन तर ज्ञानोदय महाविद्यालयची कोमल सिंग यांची “ठाणे युथ आयकॉन”म्हणून निवड झाली असून ठाणे महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेंद्र बनसोड यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी उप मुख्य स्वच्छता निरीक्षक दिपक आहिरे, उप मुख्य स्वच्छता निरीक्षक संतोष पातकर उप मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री.काझी, स्वच्छता निरीक्षक अमित मोते आदी उपस्थित होते.
ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड व शहरातील युवक यांच्यामध्ये सुसंवाद साधण्याच्या उद्देशाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका अतिरिक्त आयुक्त (2) समीर उन्हाळे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील १९ ते २८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. प्रत्येक महाविद्यालयातून ३ मुले व ३ मुली यांचे नामांकन करण्यात आले होते.या नामांकन केलेल्या विद्यार्थ्यासाठी त्या त्या महाविद्यालयात मतदान घेऊन प्रत्येकी १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी यांची निवड करून एकूण २० विद्यार्थ्यांपैकी अंतिम “ठाणे युथ आयकॉन” म्हणून सहयोग व्यवस्थापन महाविद्यालयचा रोहित महाजन तर ज्ञानोदय महाविद्यालयची कोमल सिंग यांची “निवड करण्यात आली. या विजेत्या विद्यार्थ्यांना डीजी ठाणेच्यावतीने पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. “ठाणे युथ आयकॉन”म्हणून निवडलेले हे विद्यार्थी महाविद्यालयीन स्तरावर स्मार्ट ठाणे युथ आयकॉन म्हणून सहभागी होणार आहेत.
दरम्यान ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ अभियानांतर्गत जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण झाले.‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ ही स्पर्धा संपूर्ण देशामध्ये सुरु झाली आहे.या स्पर्धेत ठाणे शहर सहभागी झाले आहे. ठाणे शहराला ‘स्वच्छ ठाणे’ ‘सुंदर ठाणे’ बनवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून सर्व नागरिकांनी आपल्या परिसर स्वच्छ ठेवून ठाणे शहराला देशातील पाहिलं स्वच्छ शहर म्हणून बहुमान मिळवून द्यावा असे आवाहन या पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले.यावेळी शहरातील महाविद्यालयातील प्राध्यापक,व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments