सागर उटवाल यांची शिवसेना सोशल मीडिया कल्याण लोकसभा क्षेत्र प्रमुख पदी नियुक्ती
कल्याण:- शिवसेना पक्षात काम करणारे तसेच सोशल मीडिया मध्ये शिवसेनेद्वारे होत असलेल्या समाज कार्याची माहिती लोकांपर्यंत पोचविणारे सागर उटवाल यांच्या परिश्रमाला पाहून शिवसेना नेते व ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून तसेच कल्याण लोकसभे क्षेत्राचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर उटवाल यांची शिवसेना सोशल मीडिया कल्याण लोकसभा क्षेत्र प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीची बातमी कळताच परिसरातले नागरिकांनी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सागर उटवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
सागर उटवाल यांनी बदलापूर विकासशी बोलताना सांगितले कि, माझ्यावर जो विश्वास दाखवून पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहि ती मी योग्य रितीने पार पाडीन.
सागर उटवाल यांनी बदलापूर विकासशी बोलताना सांगितले कि, माझ्यावर जो विश्वास दाखवून पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहि ती मी योग्य रितीने पार पाडीन.

No comments