अंबरनाथ वाहतूक विभागाच्या धडक कारवाईमुळे मुजोर रिक्षाचालक वठणीवर
बदलापूरः- खैरातप्रमाणे रिक्षा परमिट वाटल्यामुळे बदलापूर शहरात तीनचाकी रिक्षाचे जणु पुरच आले. प्रवाशांपेक्षा जास्त संख्या रिक्षांची झाल्याने बदलापूरात स्टेशन जवळ पूर्व व पश्चिम दोन्ही ठिकाणी लोकांना चालतांना देखील भरपूर त्रास होत होते. त्यातच "मुजोर" रिक्षाचालक जेथे तेथे नियमांचे उल्लंघन करुन प्रवाश्यांसाठी रिक्षा थांबवीत असल्याने ट्राफिक जॅम व इतर समस्यांना दररोज बदलापूरकरांना सामोरे जावे लागत होते.
या समस्येकडे अंबरनाथ वाहतुक विभागाने विशेष लक्ष देत नुकताच तीन दिवस मुजोर रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी म्हणुन जोरदार मोहीम राबिवण्यात आली. नागरिकांना तसेच रहदार्यांना ज्या-ज्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर तसेच स्टेशन परिसरात मुजोर रिक्षाचालकांमुळे त्रास होत होते त्याठिकाणी ट्राफिक पोलिसांची नेमणुक करुन तेथील मुजोर रिक्षा चालकांवर धडक कारवाई करण्यात आली.
अचानक झालेल्या जोरदार कारवाईमुळे नियम न पाळणारे रिक्षाचालक वठणीवर आले असुन रस्त्यावरुन पायी चालणाऱ्या नागरिकांनी तसेच रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी अंबरनाथ वाहतुक विभागाचे आभार मानले.

No comments